mobile Learning.jpg 
पुणे

पुण्यात वस्ती भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून राहतायेत वंचित कारण...

जितेंद्र मैड

कोथरूड (पुणे) : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे प्रयोग सर्वत्र राबवले जात आहेत. परंतु, काही विद्यार्थ्यांजवळ मोबाईलच नसल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी जुने, परंतु ऑनलाइन शिक्षणासाठी उपयुक्त ठरतील असे मोबाईल गरजू विद्यार्थ्यांना द्यावेत, असे आवाहन कोथरूडमधील विविध शाळांमधील शिक्षकांनी केले आहे.

सौ. प्रतिभाताई पवार विद्यामंदीरचे मुख्याध्यापक शाम धुमाळ म्हणाले की, केळेवाडी सारख्या कष्टकरी वसाहतीमध्ये आमची शाळा आहे. येथे येणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तके दिली आहेत. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. आम्ही दानशूर व्यक्तींना आव्हान केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लायन्स क्‍लब ऑफ पुणे 21 सेंचुरीच्या वतीने दोन गरजू विद्यार्थिनींना नुकतेच मोबाईल देण्यात आले. आम्हाला अजूनही सुमारे पन्नास मोबाईलची आवश्‍यकता आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणास उपयोग होईल.

एरंडवणा भागातील ज्ञानदा प्रशालेतील कर्मचारी राजेंद्र येडे यांनी सांगितले की, आमच्या प्रशालेत वस्ती भागातील विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आता मोबाईलची कमतरता भासत आहे. आमच्या शाळेने आव्हान केल्यावर काही दानशूर व्यक्तींकडून गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत देण्यात आली. आता आम्हाला मोबाईलची आवश्‍यकता आहे. मुळशी तालुक्‍यातील लीलाबाई कांबळे म्हणाल्या, माझ्या नातवंडाचे मित्र मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास शिकत होते. पण आमच्याकडे फोन नव्हता. लायन्स क्‍लबच्या वतीने माझ्या नातवाला एक मोबाईल मिळाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुना मोबाईल गरजू विद्यार्थ्याला द्या
लॉकडाउनमध्ये अनेकांचे संसार कोलमडले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्ट फोन व इंटरनेट कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलेही हवालदिल झाली आहेत. समाजातील गरजूंना आपला जुना मोबाईल दिला तर एका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागेल, असे लायन शमा गोयल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT