file.jpg 
पुणे

पुणे : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला पूर्व हवेलीतील गावांचा आढावा

सकाळवृत्तसेवा

मांजरी : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पूर्व हवेलीतील सहा गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केलेल्या या गावात घेतली जाणारी खबरदारी, सर्वेक्षण, उपाययोजना आणि क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची परिस्थिती याबाबत माहिती घेऊन त्यांनी पोलिस, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व संबंधीत इतर विभागांच्या समन्वयाबाबत सूचना केल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आज दिवसभरात मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, वाघोली, केसनंद, बकोरी व शेवाळेवाडी अशा सहा ग्रामपंचायतींना भेट दिली. या गावांमध्ये यापूर्वी कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतींकडून आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, या उपाययोजना राबविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांना जाणवले.

यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनातील पोलीस, आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांच्यात परस्पर समन्वय ठेवण्याची सूचना कोहिनकर यांनी केली. प्रतिबंधीत क्षेत्र व लॉकडाऊन बाबतचे नियम ग्रामस्थांकडून अधिकाधिक काटेकोरपणे पाळले जावेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका निभावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मांजरी बुद्रुक व वाघोली सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींकडून होत असलेली कोरोना विरुध्दची अंमलबजावणी तसेच ग्रामस्थांच्या स्वयंशिस्तीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ सचिन खरात, वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदर परिसरातील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईत टाकल्याचा प्रकार

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT