deputy cm ajit pawar statement on early working style 
पुणे

Video:अजित पवार म्हणतात, 'अधिकाऱ्यांनी लवकर उठलं तर, बिघडलं कुठं?'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सकाळी लवकर काम करण्याच्या शैलीमुळं शासकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. आज सकाळी सात वाजल्यापासूनच अजित पवार यांनी कामांचा धडाका लावला. त्यावर, 'मी आठ दिवसांतून इथं येणार, अधिकाऱ्यांनी 8 दिवसांतून एकदा लवकर उठलं तर, बिघडत नाही', अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. 

शरद पवारांनी लावलेली सवय
जिल्हा परिषदेतील पदासाठी इच्छुक सदस्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, 'सकाळी  सहापासून कामाला लागायचं हीच माझी स्टाईल आहे. शरद पवार यांनी आम्हाला तसं शिकवलं आहे. त्याला मी काय करू शकत नाही. मुळात मी आठ दिवसांनंतर पुण्यात येणार. मी रोज इथ नसतो. मग, आठ दिवसांतून एकदा अधिकाऱ्यांनी लवकर उठलं तर काही बिघडणार नाही. पोलिसांना घरं मिळाली पाहिजेत, यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळचं त्या कामाची सकाळी पाहणी केली.'

सारथीबाबत काय म्हणाले अजित पवार?
सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलन करत आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, 'सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहेत. चुकीचं काही घडलं असेल तर, कुणाचीही गय केली जाणार नाही. चुकीचं घडलं असेल तर आम्ही बदल करू. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांची माझी भेट झालेली नाही. पण, मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी उपोषण करू नये. त्यांनी मुंबईत येऊन चर्चा करावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT