Kirit Somaiya News Updates sakal
पुणे

देशमुखांच्या शेजारची कोठडी परब-राऊतांसाठी तयार ठेवा - सोमय्या

भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला शक्तीप्रदर्शन केले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑर्थर रोड कारागृहातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारी असलेली कोठडी सॅनिटाईज करून ठेवायला सांगा. त्या ठिकाणी मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांची जागा नक्की आहे. त्यांना तिथे जावे लागणार आहे, असा इशारा भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज (ता. ११) पत्रकार परिषदेत दिला.

जम्बो कोवीड रुग्णालयातील भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने याची चौकशी करावी या मागणीचे निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला शक्तीप्रदर्शन केले. आयुक्तांची भेट झाल्यानंतर सोमय्या यांनी महापालिकेत आणि पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

सोमय्या म्हणाले, ‘‘ खासदार राऊत यांना सर्वाधिक भीती वाटते ती प्रवीण राऊत यांची. ईडीच्या कोठडीत असलेला प्रवीण राऊत तपासात ईडीला काय माहिती सांगेल या भीतीने राऊत यांना ग्रासले आहे. प्रवीण राऊत यांच्या रूपाने खासदार राऊत यांचा एक पार्टनर जेलमध्ये गेला आहे. त्यामुळे आता अजित पाटकर जेलमध्ये गेले तर राऊत यांचे काय होणार असा प्रश्‍न खुद्द राऊत यांनाही पडल्याने ते घाबरले आहेत.’’

सोमय्या म्हणाले, ‘‘ खासदार राऊत व मंत्री परब यांची स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, भ्रष्टाचाराचे पुरावे इतके प्रचंड आहेत की त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही. मात्र, यातून वाचण्याचा प्रयत्न दोघांकडूनही सुरू असून माझ्यावर करण्यात आलेला हल्ला या कारस्थानाचा एक भाग आहे. पुण्यातील जम्बो कोवीडमध्ये सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचारावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा.त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे पोलिस आयुक्त विक्रमकुमार व शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र, ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांना वाचविण्यासाठी पोलिस कोणतीच कारवाई करीत नाहीत.’’

केलेली चुकीची कामे लपविण्यासाठी शिवसैनिकांनी महापालिकेत माझ्यावर हल्ला केला होता. मात्र,अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधातील माझा आणि माझ्या पक्षाचा लढा यापुढेदेखील असाच चालू राहील. माझा लढा थांबविण्याची ताकद ठाकरे सरकारमध्ये नाही.

पीएमआरडीए आणि महापालिका आयुक्त हे यामध्ये घोटाळा झाल्याचे मान्य करत आहेत. कंपनीचे पार्टनर हे बेनामी आहेत. ही कंपनी बोगस होती, म्हणून महापालिका आयुक्तांनी ही कंपनी टर्मिनेट करण्याचे पीएमआरडीएला सांगितले, त्यामुळे काम काढून घेण्यात आले. अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलिस आयुक्त नसून, ते ठाकरे सरकारचे एजंट आहेत, या शब्दात सोमय्या यांनी हल्ला चढविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT