Technology should be used to control crime in the city and district said Home Minister Anil Deshmukh 
पुणे

पुण्यातील गुन्हेगारीवर तंत्रज्ञान ठेवणार नियंत्रण; 'हे' अॅप ठरणार उपयुक्त

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर व  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी आढावा घेतला. देशमुख यांनी यावेळी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना पुणे,पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलिस दलाच्या अधिकाऱ्याना दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

देशमुख यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची बैठक घेतली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,  जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घट्टे आदी अधिकारी उपस्थित होते. 

गृहमंत्री देशमुख यांनी कोरोना आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार केलेल्या आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी केलेल्या "एक्स्ट्रा" (Tracking of Externees) अॅपची  माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या आरोपीनी पुन्हा पुणे शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता 'एक्स्ट्रा'अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे. या अॅपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होणार आहे, असे बच्चन सिंग यांनी यावेळी सांगितले. तर जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी 'स्मार्ट पोलिसिंग' बाबत माहिती दिली.

'ते' आले, पोलिस असल्याचे सांगितले अन् एक लाख रूपये घेऊन गेले

'एक्स्ट्रा'अॅप'चा असा होणार फायदा
- हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल.
-हद्दपार गुन्हेगारावर देखरेख करणे सोयीस्कर होईल.  
- कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य होईल.
- हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होवून पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.
-ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील नमुद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवू शकतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT