Ajit Pawar esakal
पुणे

Ajit Pawar : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून विकास करायचा आहे

केंद्राचा निधी या लोकसभा मतदारसंघात आणून विकास कामे वेगाने मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे.

मिलिंद संगई,

बारामती - या मतदारसंघाचा मला सर्वांगिण विकास करायचा आहे, राज्याचा अर्थसंकल्प एखाद्या धरणासारखा असतो तर केंद्राचा अर्थसंकल्प समुद्रासारखा असतो, अशी तुलना करत केंद्राच्या निधीच्य मदतीने या परिसराचा कायापालट करण्यासाठी सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

टीकाटीपण्णीपेक्षाही अजित पवार यांनी आता केंद्राचा निधी आपल्या विचाराच्या खासदारांना मिळेल आणि त्यातून अनेक नवीन प्रकल्प मार्गी लावता येतील, अशी भूमिका घेत आता प्रचाराचा जोर केंद्राच्या पाठिंब्याची गरज आहे अशा आशयाने लावल्याचे आज स्पष्ट झाले.

केंद्राचा निधी या लोकसभा मतदारसंघात आणून विकास कामे वेगाने मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे. दुर्देवाने गेल्या काही वर्षात केंद्राचा म्हणावा असा निधी या मतदारसंघात आला नाही, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने मी निधी खेचून आणू शकतो, त्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघाचा कायापालट घडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामतीत जयजवान आजी माजी सैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. पवार म्हणाले, नरेंद्र मोदींना विनंती केल्यानंतर बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम त्यांनी तातडीने भूमीपुजनाच्या यादीत घेतले आणि आता हा रेल्वे मार्ग मार्गी लागला आहे. राज्यामध्ये सर्वाधिक सुंदर बसस्थानक आपण साकारले आहे.

बारामतीत कायदा व सुव्यवस्था नीट राहील या साठी पोलिस दलाला योग्य त्या सूचना दिल्या जातील, कायमच या बाबत मी सतर्क असतो, काही घटना घडलेल्या आहेत, त्याचा पोलिस तपास संपल्यानंतर त्यात काय वस्तुस्थिती होती या बाबत सांगेन असेही अजित पवार यांनी सांगितले. बारामतीच्या सर्वांगिण विकासाचाच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: गणेशोत्सवाआधी आनंदाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली

What a Comeback: मिराबाई चानू वर्षभरानंतर स्पर्धेत उतरली अन् पटकावलं ऐतिहासिक 'गोल्ड'; सोबत चार खेळाडूंनीही जिंकले सुवर्ण

Manoj Jarange Patil : फडणवीस साहेब मराठ्यांच्या पोराला काठीने डिवचले तर सरकार उखडून टाकेल

Pune Crime : विनापरवाना फ्रेशर्स पार्टीचे आयोजन; ‘किकी’ पबवर गुन्हा

Latest Marathi News Updates:अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT