‘पानवडी (ता. पुरंदर) गावाप्रमाणेच ८५० पेक्षा जास्त गावांमध्ये ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली आहेत.
गराडे - ‘पानवडी (Panwadi) (ता. पुरंदर) गावाप्रमाणेच ८५० पेक्षा जास्त गावांमध्ये ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या (Sakal Relief Fund) माध्यमातून जलसंधारणाची कामे (Work) केली आहेत. आणखी सुमारे १५० गावांमध्ये अशा पद्धतीची कामे सुरू आहेत. या गावांना लोकसहभागातून प्रगतीकडे घेऊन जायचे आहे. त्यासाठी गावाचा सहभाग यात असणे गरजेचे असते,’ अशी माहिती ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांनी दिली.
पानवडी येथे सकाळ माध्यम समूह, सायन्स टेक्नॉलॉजी पार्क, टास्क कोफो, मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने महिला सक्षमीकरण मोहिमेअंर्तगत पानवडी बोटिंग क्लबचे उद्घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पानवडी येथील काही महिला दहा वर्षांपूर्वी मला भेटायला आल्या होत्या.
त्यावेळी त्यांनी गावच्या समस्या मांडल्या. त्यानंतर काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या गावचा विकास करण्याचे ठरवले. गाव पाण्याचा योग्य वापर करत आहे. त्यामुळे गावाची प्रगती होताना दिसत आहे.’ यावेळी सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक राजेंद्र जगदाळे आणि टास्क कोफो, मुकुल माधव फाउंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यटकांसाठी स्वच्छता व नागरिकांचे राहणीमान चांगले असणे गरजेचे आहे. त्यातून आपल्या गावचा सर्वोत्तम विकास होऊ शकतो, तसेच नवनवीन उद्योग व व्यवसाय यातून तरुणांना व्यवसायात पुढे जाता येईल.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.