devendra fadnavis
devendra fadnavis sajkal
पुणे

'पुणे फर्स्ट' उपक्रमाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी "पुणे फर्स्ट" हे व्यासपीठ तयार करण्यात आले.

पुणे - पुणे शहराचा (Pune City) ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी "पुणे फर्स्ट" (Pune First) हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याच्या संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यासह आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात पुणे राज्यासह देशात अग्रेसर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा पुण्याचा देशातील सर्वात मोठे शहर क्रमांक लागतो. पुण्याबद्दलची माहिती जगभर पोहोचविण्यासाठी ‘पुणे फर्स्ट’ या उपक्रमाची सुरवता केली आहे.

पुण्याच्या विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत, गट- तट, पक्षिय मतभेद बाजूला ठेवून "पुणे फर्स्ट" या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे यासाठी व्यासपीठाचा उपयोग होईल, असे गणेश बीडकर यांनी सांगितले.

www.punefirst.org या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT