baramati  sakal
पुणे

Dhangar Reservation : दोन दिवसात धनगर आरक्षण न मिळाल्यास आत्महत्या करणार - किशोर मासाळ

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांचा इशारा....

मिलिंद संगई, बारामती

बारामती, ता. 18- धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित होऊन येत्या 20 सप्टेंबर रोजी खंबाटकी घाट अडविण्याचे आंदोलन झाल्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केली आहे.

आज फेसबुक लाईव्ह करत त्यांनी प्रशासनासह राज्य सरकारलाही दोन दिवसात धनगर आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा खंबाटकी घाटातील रास्ता रोकोनंतर मी माझे जीवन संपविणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला सातत्याने आरक्षणाची भूलथापा देत त्यांच्या भावनांशी खेळण्याचेच काम केले गेले, प्रत्यक्षात आरक्षण काही मिळालेच नाही, त्या मुळे मला आता जगण्याची इच्छा राहिलेली नसून मी माझे जीवन संपविणार असल्याचे त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये नमूद केले.

किशोर मासाळ हे बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नुकतेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. धनगर आरक्षणाच्या चळवळीत मासाळ कार्यरत असून त्यांनी आता आरक्षणासाठी टोकाची भूमिका जाहीर करुन खळबळ उडवून दिली आहे.

मी आत्महत्या करणार असा मेसेज किशोर मासाळ यांनी व्हायरल केल्यानंतर बारामतीतही काही काळ गोंधळाचे वातावरण होते. त्यांनी फेसबुक लाईव्हवर आपली सविस्तर भूमिका मांडत सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देऊ केला आहे. या काळात योग्य तो निर्णय झाला नाही तर आपण आपले जीवन संपवू, त्याला राज्य सरकार व संबंधित यंत्रणा व नेते जबाबदार असतील असेही त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये नमूद केले आहे.

इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले गेले, धनगर आरक्षणाबाबतीतल गुन्हे मागे घेतले जात नसल्याबद्दलही त्यांनी हा दुजाभाव सरकार का करत असल्याचा सवाल उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर आता धनगर आरक्षणाची तीव्रता वाढू लागल्याने सरकार या बाबत नेमकी काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT