dhol march on tuesday shivne against oppressive municipal tax in 34 newly incorporated villages pune
dhol march on tuesday shivne against oppressive municipal tax in 34 newly incorporated villages pune Sakal
पुणे

Pune : शिवण्यात मंगळवारी ढोल मोर्चा; नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील पालिकेच्या जाचक कराविरुद्ध अभिनव आंदोलन

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील जाचक कराविरुद्ध शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, कोपरे नागरी कृती समितीच्या वतीने शिवण्यात मंगळवार. (दि.१२ मार्च) सकाळी १० वाजता ढोल मोर्चा आयोजित केला आहे.

महापालिका कर न भरणाऱ्या मिळकतदारांच्या घरी वाद्ये वाजवुन मानहानी केली जाते. त्याचप्रकारे शिवणे येथील आहिरेगेट येथून शिवणे येथील पालिकेच्या कर संकलन कार्यालयासमोर ढोल- ताश्याच्या गजरात पायी मोर्चा काढून निर्दशने करण्यात येणार आहे.

पालिकेचा येणारा 'भरमसाठ कर' व त्यावरील ’जाचक व्याज' याविषयी स्थानिक मिळकतदारांनी मागील पाच ते सहा वर्षापासून राज्य सरकार व पालिकेकडे योग्य कर आकारणीची मागणी केली.

ग्रामपंचायत मधील निवासी तसेच बिगर निवासी मिळकतींना असणारा कर आणि पालिकेतील गावे समाविष्ट झाल्यानंतर मिळकतींना येणारा कर यात १० पटीने वाढ झालेली आहे. कर आकारणी करताना कर हा ग्रामपंचायत काळातील अंतिम वर्षाच्या कराच्या रकमेच्या दुपटीपेक्षा जास्त नसावा. ही आमच्या सर्व मिळकतदारांची मागणी आहे. या मागणीला कोणतीही दाद दिली नाही.

कर आकारणी मधील काही त्रुटी पुढिल प्रमाणे

- सेलेबल / बिल्टअप क्षेत्र ऐवजी चटई क्षेत्रफळ ग्राह्य धरावे

-मिळकतींना मिळणाऱ्या भाडे पट्टी नुसार त्यांचा वाजवी भाड्याचा दर निश्चित करा

- पूर्वी समाविष्ट पेठेचा/ गावाचा वाजवी भाड्याचा दर लाऊ नये

-अधीनियमानुसार समाविष्ट झाल्यावर पहिले दोन वर्ष ग्रामपंचायतीचा अखेर वर्षाचा कर घ्यावा.

-नोंद नसलेल्या मिळकतींना तीन पट ऐवजी पिंपरी- चिंचवडला ३ मार्च २०२३ रोजीच्या निर्णया प्रमाणे कर आकारणी एक पटीने आकारावी.

-या बाबींची स्पष्टता येत नसल्यामुळे गावातील बहुतांश मिळकतदारांनी कर भरला नव्हते.

-त्यामुळे तो वार्षिक कर प्रतीमहा दोन टक्के व्याजदर न लावता योग्य कर प्रणाली अंमलात आणावी.

-निवासी व बिगर निवासी मिळकतींचे मिळणारे भाडे पाहता आलेली कराची रक्कम भरणे शक्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT