पुणे - कळत्या वयापासून मी रोजनिशी लिहू लागले होते; परंतु महाविद्यालयीन जीवनापासून दैनंदिन घडामोडींपेक्षा भावना व्यक्त करण्याचं ठिकाण म्हणून माझी डायरीशी नव्यानं ओळख झाली...
डायरीत दडलेलं भावविश्व उलगडत होती ज्योती सरोदे ही तरुणी. ती म्हणतेय, ‘‘नववर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी गिफ्ट म्हणून रोजनिशी मिळायची; पण गेल्या वर्षांत मिळालेल्या अधिक वेळामुळे मी जुन्या वह्यांतील कोऱ्या पानांची जोडणी करून घरीच डायरी बनवली. डिजिटल डायरी हा पर्याय उपलब्ध असला तरी, पुस्तके वाचण्याची खरी भावना त्याच्या कागदी स्पर्शात आहे. तसेच डायरीचे सुद्धा असते.’’
गेमर्ससाठी खुशखबरी! २६ जानेवारीला येणार पब्जीचा देशी अवतार FAU-G
नव्या वर्ष उजाडलं की, नवी डायरी ही आलीच. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही डायरीचा वापर सर्व वयोगटांतील लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे या व्यवसायावर कोणतीही मर्यादा आली नसल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
या डायऱ्यांना पसंती
बिझनेस डायरी, कॉर्पोरेट डायरी, संडे फूल अशा विविध प्रकारच्या डायऱ्यांना नेहमी मागणी असते. सध्या डायरीसाठी पर्याय म्हणून विविध डिजिटल ॲप उपलब्ध आहेत. गेल्या सहा वर्षांपासून हा व्यवसाय करतोय; पण डायरी वापरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, असे व्यावसायिक जगन्नाथ काकडे यांनी सांगितले.
पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!
प्रवासात ज्यावेळी डायरी पेन काढून लिहिणे शक्य होत नाही, त्यावेळी बऱ्याचदा सुचलेले विचार विसरून जाऊ नये याकरिता मी स्मार्ट फोनमधील नोटपॅड, पेन्झु आणि जर्नी ॲप्लिकेशन्स, जी-मेलची ड्राफ्ट सुविधा, व्हॉट्ॲपला ब्लॉक केलेल्या व्यक्तींच्या मेसेज विंडोमध्ये हे विचार टाइप करून ठेवते.
- प्रिया वसंत
सध्या मोबाईल फोन जास्त सोयीचा झाला असल्यामुळे हल्ली मी डायरीचा वापर खूप कमी करते. यासाठी मी ‘कलर नोट्स’ हे ॲप्लिकेशन वापरते; पण माझ्याकडे लेदरपासून हाताने तयार केलेल्या सर्व प्रकारच्या डायऱ्यांचे मोठे कलेक्शन आहे. काम म्हणून नाही तर छंद म्हणून डायरी जपली आहे.
- सई कावळे
नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक वेळी नातेवाईक व मित्रपरिवाराला भेट वस्तू देतो. यंदा सर्वांना भेट स्वरूपात डायरी देणार आहे. तसं मी डायरीचा फार वापर करत नाही; परंतु जे याचा वापर करतात त्यांना नक्कीच ही भेट आवडेल.
- प्रमोद साळवी, ग्राहक
डिजिटल डायरीचे ॲप
नोशन
एव्हर नोट
वन नोट
गुगल कीप
स्टॅंडर्ड नोट
टायपोरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.