Untitled-10.jpg 
पुणे

केस लांबविण्यासाठीच आरोपींचे विविध अर्ज; माओवादी संबंध प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईसमधील डेटा नेमका किती जीबी आहे, याचा नेमका आकडा तपास अधिकारी नाही तर फॉरेन्सिक लॅब्रोटरी (एफएसएल) देवू शकते. प्रकरण आता आरोपी निश्‍चितीपर्यंत पोचले आहे. मात्र खटला लांबविण्यासाठी आरोपी विविध अर्ज करीत आहे, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सोमवारी केला.

पोलिसांनी आम्हाला दिलेल्या क्‍लोन कॉपीची आणि जप्त केलेल्या डेटाची हॅश व्हॅल्यू काढून ती तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेल्या डेटाची क्‍लोन कॉपी हॅश व्हॅल्यूसह पुरवावी, अशी मागणी करणारा अर्ज एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर सरकार पक्षाने आपली बाजू मांडली.

25 जीबी डेटा जप्त करून आम्हाला केवळ 16 जीबी डेटा देण्यात आला असे आरोपींचे म्हणणे आहे. मात्र नेमका किती जीबी डेटा आहे हे एफएसएलच सांगू शकते. एफएसएलने दिलेल्या सर्व रिपोर्टची कॉपी आरोपींना देण्यात आली आहे, असा युक्तिवाद पवार यांनी केला. तर आरोपींना मूळ मुद्देमालाची हॅश व्हॅल्यू देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला डेटा हा अंदाजे 25 जीबी असल्याचे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे, असे या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी न्यायालयास सांगितले.

विश्‍लेषण बाकी असलेला डेटा अद्याप आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस उर्वरित डेटा खटला सुरू झाल्यानंतर देणार का असा प्रश्‍न बचाव पक्षांचे वकील शाहीद अख्तर यांनी उपस्थित केला. तर आरोपींना देण्यात आलेली क्‍लोन कॉपी आमच्या कामाची नाही. कारण ती क्‍लोन कॉपीची कॉपी करून तयार करण्यात आली आहे. सील केलेला डेटा हा आरोपींच्या ताब्यातूनच जप्त करण्यात आला आहे की नाही याबाबत शंका आहे. ते समजून घेण्यासाठी आम्हाला मूळ डेटाची क्‍लोन कॉपी हवी आहे, अशी मागणी बचाव पक्षांचे वकील रोहन नहार यांनी केली. आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या अर्जावर 3 फेब्रुवारी रोजी निकाल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Grishneshwar Temple Closure : पर्यटन हंगामात घृष्णेश्वर मंदिर बंद नको; प्रशासनाच्या प्रस्तावास ग्रामस्थ, व्यावसायिकांचा तीव्र विरोध

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

ऑक्टोबरचा पहिला आठवडा ठरणार खास! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल; पैसा, करिअर आणि नात्यांमध्ये मिळणार शुभ संकेत, तुमची रास कोणती?

Ahilyanagar Water Storage: निळवंडे धरणाचा पाणीसाठा १५ दिवसांत १० टक्क्यांनी घटला; पुढील आवर्तनांसाठी काटेकोर नियोजनाचे आव्हान

SCROLL FOR NEXT