difficult situation on Historical heritage BHIDE WADA girls education Bottles of liquor packs of cigarettes pune sakal
पुणे

मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या भिडे वाड्यावर ओढवली बिकट परिस्थिती

दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे याचा खच ; मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या वाड्याचा रचला पाया

- मीनाक्षी गुरव

पुणे : भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला भिडे वाडा; म्हणजेच देशातील मुलींची पहिली शाळा. पण मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या या वाड्याचा पाया आता खचला आहे. एवढंच नव्हे, तर हा वाडा अत्यंत बिकट परिस्थितीत असून येथे दारूच्या बाटल्या, बिछाना टाकल्याचे उघडकीस आले आहे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या वाड्यात आता दारूच्या पार्ट्या आणि व्यसनांचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

या वाड्याच्या खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या, वेफर्सच्या पाकिटांचा कचरा, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच पडल्याचे पाहायला मिळते. हे कमी होते की काय पण येथे अक्षरक्ष: जमिनीवर घातलेला बिछाना, दोरीवर वाळत घातलेले कपडेही असा प्रकार निदर्शनास येत आहे. वाड्याची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था पाहून त्याचा बचाव करण्यासाठी ‘भिडे वाडा बचाव मोहीम यांनी पुढाकार घेतला आहे. भिडे वाड्यात घडणाऱ्या गैरप्रकाराविरोधात फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेंद्र लांडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भिडे वाडा बचाव मोहिमेचे संस्थापक प्रशांत फुले आणि पाक्षिक अरिहंतच्या मुख्य संपादिका गीताई गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.

‘‘देशातील मुलींची पहिली शाळा अशी ओळख असणारा हा वाडा दारूचा अड्डा बनला आहे. येथे पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. पुणे महापालिकेचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर याकडे लक्ष घालून महापालिकेने या वाड्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमावा. कोणतीही वास्तूला राष्ट्रीय स्मारक जाहीर करण्यात येते, तेव्हा वास्तूची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी तेथे सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक आहे. असे असूनही आजपर्यंत येथे महापालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. महापालिका याकडे जाणून-बुजून काणाडोळा करते का!, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.’’

‘‘भिडे वाड्याच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने येथे तातडीने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा. तसेच भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक उभारून येथे पुन्हा मुलींसाठी शाळा सुरू करण्यात यावी,’’ अशी मागणी भिडे वाडा बचाव मोहिमेचे संस्थापक प्रशांत फुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार, शिंदेंच्याच पदाधिकाऱ्याची हायकोर्टात याचिका

Chandoli Koyna Tiger Territory : चांदोली, कोयना जंगलात वाघांनी हद्दी केल्या फिक्स, तीन वाघांमध्ये कोणाची दादागिरी

Crime News : थरार केरळमधील शोधमोहिमेचा! बोईसरच्या चिमुकल्याला पोलिसांनी मृत्यूच्या दाढेतून नाही, तर पित्याच्या विळख्यातून सोडवले

Horoscope : 26 जानेवारीपासून 1 फेब्रुवारी दरम्यान बदलणार 'या' 5 राशीचं नशीब! वैवाहिक जीवनात अडचणी; नोकरी धंद्यात यश, मोठी समस्या संपणार

Nashik Kumbh Mela : हिंदुत्ववादी सरकार असूनही उदासीनता का? त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा निधीवरून महंतांनी उठवला सवाल

SCROLL FOR NEXT