पुणे - महाविद्यालये सुरू करण्याची तयारी आहे. मात्र राज्यातील अनेक महाविद्यालयांच्या संकुलात, वसतिगृहात विलगीकरण कक्ष आहेत. तर अनेक विद्यातीलयातील विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० टक्के विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यामुळे विलगीकरण कक्षांमुळे महाविद्यालये सुरू करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत ही माहिती दिली. सामंत म्हणाले, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसह झालेल्या बैठकीत विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हानिहाय, तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या बाबतचा अहवाल काही दिवसांत सादर करण्यात येईल. त्यामुळे दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय पुढील काही दिवसांत घेतला जाईल. टप्प्याटप्प्याने, नियमांचे पालन करून, नियंत्रित प्रवेश संख्येने महाविद्यालये सुरू करावी लागतील. टीचर्स ट्रेंनिग ऍकॅडमीच्या बांधकाम ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. याचा आढावा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. या ऍकॅडमीचा फायदा उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबतच शालेय शिक्षण विभागालाही होणार आहे. येत्या काही दिवसात ऍकॅडमीचे उद्घाटन होईल, असे सामंतही यांनी सांगितले.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधनवाढ :
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना जास्तीचे मानधन मिळण्यासाठी २५ टक्के मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांना हा निर्णय लागू असेल. घड्याळी तासिका या संकल्पनेचा मंत्रालय स्तरावर चुकीचा अर्थ लावल्याचा फटका प्राध्यापकांना बसत होता. मात्र आता ही उणीव दूर करण्यात आली असून प्राध्यापकांना दर महिना पंचवीस ते तीस हजार रुपये मानधन मिळू शकेल, असेही सामंत यांनी सांगितले.
प्राध्यापक भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर प्राचार्यांच्या रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. प्राध्यापक भरतीमध्ये ज्या विषयांना प्राध्यापक नाहीत, ज्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती झालेली नाही त्यांना प्राधान्य देता येईल. त्याचा आढावा घेण्यात येत आहे.
- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.