दिलीप वळसे  Sakal
पुणे

बैलगाडा शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश : दिलीप वळसे

शेतक-यांवर आंदोलन तसेच बैलगाडा याञा आयोजन करण्यासंदर्भात झालेले गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

नवनाथ भेके, निरगुडसर

निरगुडसर : शेतक-यांवर आंदोलन तसेच बैलगाडा याञा आयोजन करण्यासंदर्भात झालेले गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार असुन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांना त्याबाबत सुचना देण्यात आल्याची माहीती राज्याचे गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

नागापुर(ता.आंबेगाव)श्रीक्षेञ थापलिंग देवस्थान याठिकाणी दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, दुस-या दिवशी रविवार ता.२७ रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या याञेला राज्याचे गृहमंञी दिलीप वळसेपाटील यांनी भेट दिली. यावेळी नागापुर ग्रामस्थांच्या वतीने वळसेपाटील यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी उपस्थित शेतकरी, बैलगाडा मालक यांना मार्गदर्शन प्रसंगी वळसेपाटील बोलत होते.

शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, श्रीक्षेञ थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे जिल्हा परीषेदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, किशोर दांगट, प्रदीप वळसेपाटील, सचिन भोर, अंकित जाधव, सरपंच सुजाता रिठे, उपसरपंच सुनिल शिंदे, गणेश यादव उपस्थित होते.

वळसेपाटील म्हणाले की, महविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी शेतक-यांची केलेली कर्जमाफीमध्ये वेळेवर पैसे भरलेल्या शेतक-यांना ५० हजार रुपयांची सवलत देण्याचा निर्णय झाला होता. परंतु कोरोनामुळे पैसे देणे शक्य झाले नाही. परंतु नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये कर्जमाफीच्या रकमेची तरतुद करण्यात आली असुन लवकरच शेतक-यांना ५० हजार रुपये त्यांच्या खात्याप्रमाणे मिळणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT