Dilip Walse Patil warns Department of Revenue and Public Works 
पुणे

....तर गय केली जाणार नाही : दिलीप वळसे पाटील यांचा 'या' खात्याला इशारा 

डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजाविषयी जनतेकडून तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महसूल मधील दोन जणांवर कारवाई केली आहे. यापुढे आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकार आढळून आल्यास गय केली जाणार नाही. असा इशारा राज्याचे कामगार उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

मंचर (ता.आंबेगाव) येथे सोमवारी कोविड व अन्य कामकाजाच्या झालेल्या आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पंचायत समिती सभापती संजय गवारी, प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, कार्यकारी अभियंता व्हि.आर.नाईक, एच.एस.नारखेडे, तहसिलदार रमा जोशी, गटविकासअधिकारी जालिंदर पठारे, कृषी अधिकारी टी.के.चौधरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, डॉ. चंदाराणी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपअभियंता एल.टी.डाके, एन.एन.घाटुळे, उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वळसे पाटील म्हणाले, " खरेदी खत, वारस हक्क नोंदी, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. मंचर मंडलधिकारी यांच्याविषयी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व कंत्राटदारांचे साटेलोटे झाल्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जाविषयी संशय निर्माण झाला आहे. रस्त्याच्या सर्व कामांची गुणवत्ता विभागाकडून चौकशी करावी असे आदेश यावेळी वळसे-पाटील यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसुल, आरोग्य, पोलीस व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी चांगले काम केले आहे. पण, इतर कामांकडे ही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तालुका पातळीवरील विविध शासकीय समित्यांचा आढावा बैठका घेण्याचे व प्रशासन गतिमान होण्यासाठी प्रांताधिकारी यांनी काम करावे.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चक्रीवादळामुळे नादुरुस्त झालेल्या अंगणवाड्या शाळा ची दुरुस्ती त्वरित करावी. आदिवासी भागातील बेघर झालेल्या कुटुंबांना मदत होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भात रोपांची नुकसान झाले आहे. अन्य ठिकाणी भात रोपे असल्यास ती उपलब्ध करून द्यावीत. कृषी व महसूल खात्याने संयुक्त पंचनामे करावेत. क्रीडा संकुल परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तेथे पोलीस गस्त वाढून गुन्हेगारीचा बिमोड करावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT