Dimbhe Dam sakal
पुणे

Dimbhe Dam : डिंभे धरणात १५ टक्केच पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रातील गावे व वाड्यावस्त्यांवर तीव्र टंचाई

हुतात्मा बाबू गेनू जलाशय, डिंभे धरणामध्ये (ता. आंबेगाव) आजपर्यंत (ता. २९) १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे - हुतात्मा बाबू गेनू जलाशय, डिंभे धरणामध्ये (ता. आंबेगाव) आजपर्यंत (ता. २९) १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सिंचन व पिण्यासाठी धरणातून पाण्याची आवर्तने सुरू आहेत. त्यातच वाढलेली उष्णता व बाष्पीभवनाने धरणातील पाणीसाठा खालावत आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील गावे व वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

आदिवासी भागातील नागरिकांवर पाऊस जास्त लांबू नये अशीच प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील फुलवडे, आंबेगाव, बोरघर, वचपे, पंचाळे, अडिवरे, कुशिरे, म्हाळुंगे, पाटण आदी गावांमधील शेतकरी उन्हाळ्यात गाळपेर पिके घेत असतात. मात्र, सध्या पाणी टंचाईमुळे पिके सुकू लागली आहेत.

पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात डिंभे, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जागा, येडगाव ही ५ प्रमुख धरणे असून त्यापैकी डिंभे धरण हे सर्वात मोठे आहे. या प्रकल्पातून पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्यातील ४६ गावांतील १४१२९.२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

विहिरी, कूपनलिकांनी गाठला तळ

पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे पाणलोट क्षेत्रातील बुडीत बंधारे, तळी, शिवकालीन पाण्याच्या टाक्या, विहिरी, कूपनलिका, हातपंप या पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

१४ हजार १२९.२५ हेक्टर ओलीतालील क्षेत्र (४६ गावे)

१४.८१ (४.३९६ दलघफू) प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा

जून, जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम धरण साठ्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.

- डी. एस. कोकणे, उपविभागीय अधिकारी, कुकडी पाटबंधारे विभाग, मंचर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT