abasaheb magar sakal media
पुणे

पुणे : मगरपट्टा सिटीचे संचालक आबासाहेब मगर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

मांजरी : मगरपट्टा सीटीचे संचालक व प्रगतशील शेतकरी आबासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धोंडो मगर (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, दोन पुतणे, पुतणी,  सुना, नातवंडे असा परिवार आहे.

माजी खासदार (कै.) आण्णासाहेब मगर यांच्या निधनानंतर आबासाहेब यांनी त्यांचा सामाजिक, सहकार, शैक्षणिक व राजकीय वारसा समर्थपणे सांभाळला. त्यांनी शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तर थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून काम पाहिले आहे. सध्याच्या मगरपट्टा सिटीच्या परिसरात त्यांनी ऊस शेतीबरोबर पोल्ट्री उद्योगही सांभाळला. स्वत: स्थापत्य अभियंता असल्याने त्यांनी काही काळ बांधकाम व्यवसायीक म्हणूनही काम केले.

आशिया खंडातील पहिले स्वतंत्र शहर म्हणून उभारल्या गेलेल्या मगरपट्टा सिटीच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन राहिले. सिटीचे व्यवस्थापकीय संचालक व क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर हे त्यांचे पूत्र होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT