पुणे

आंबेगाव तालुक्यात दिव्यांग मानधनापासून वंचित

डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची २५ ते ३० दिव्यांग व्यक्तींची प्रकरणे घोडेगाव तहसीलदार कचेरीतून चार महिन्यापासून गहाळ झाली आहेत. त्यामुळे संबधित लाभार्थी मानधनापासून वंचित आहेत. दिव्यागांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. अन्यथा गांधीगिरी मार्गाचा अवलंब करून गतिमान प्रशासनाचे सन्मानपत्र तहसीलदार कार्यालयाला देऊन आंदोलन केले जाईल.” असा इशारा आंबेगाव तालुका दिव्यांग समितीचे अध्यक्ष समीर टाव्हरे यांनी दिला आहे.

आंबेगाव तालुक्यात दिव्यांग व्यक्ती तीन हजार ५०० आहेत. त्यापैकी दोन हजार ७४३ दिव्यांगाना संजय गांधी योजनेचे ८०० रुपये ते एक हजार रुपये मानधन मिळते. घोडेगाव तहसीलदार कार्यालयात दिव्यांग व्यक्तींनी मानधन मंजुरीसाठी दिलेली प्रकरणे गहाळ झाली आहेत. सादर केलेल्या प्रकरणाची पोहच तहसीलदार रमा जोशी यांना दाखविल्या. संबंधित वरिष्ठ लेखनिकाला सर्व प्रकरणे शोधण्याच्या सूचना जोशी यांनी चार महिन्यापूर्वी दिल्या. पण अजून प्रकरणे मिळाली नाहीत. मंजूरीची पञ कामगार तलाठी लाभार्थ्यापर्यंत पोहचवीत नाहीत. त्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती मानधनापासून वंचित आहेत. तहसीलदार कचेरीत दिव्यांगांचा रागराग केला जातो. अधिकारी फोनही उचलत नाहीत.” असे दिव्यांग संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्वर शिंदे व उपाध्यक्ष सुनिल दरेकर यांनी सांगितले. दरम्यान, प्रकरणे गहाळ झाली नसून ती चौकशीसाठी मंडल अधिकारी व कामगार तलाठी यांचेकडे पाठविली आहेत.”अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार दामुराजे असवले यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात दिव्यांग व्यक्तींच्या प्रलंबित मागण्याबाबत (ता.२४) एप्रिल रोजी तहसिलदार यांना संघटनेच्या वतीने निवेदन दिले गेले होते. पण त्याचे उत्तर देण्याचे सौजन्यही प्रशासनाने अद्याप दाखविले नाही. कोविडच्या नावाखाली अन्य सर्वच शासकीय कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी मूल्यमापन करावे.त्यातून सत्य माहिती बाहेर येईल.” असे समीर टाव्हरे यांनी सांगितले. घोडेगाव तहसीलदार कचेरीतून संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन मंजूर झाल्याचे पत्र चार महिन्यापुर्वी आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिनोली शाखेत खाते उघडले. भंगार व्यवसायीकाने तीन चाकी जुनी सायकल मला दिली आहे. या सायकल वरून मी अनेकदा शिनोलीच्या बँकेत जातो. पण अजूनही रक्कम जमा झाली नाही.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT