पुणे

राजकीय वैर असणारे आमदार कुल व थोरातांचे पुत्र बसले मांडीला मांडी लावून

रमेश वत्रे

केडगाव ः दौंडचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र गणेश थोरात यांनी  पुणे पदवीधर मतदार संघ केडगाव मतदान केंद्राबाहेर आज चाय पे चर्चा केली. या अनपेक्षित चर्चेने उपस्थित कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मंगळवारी मतदान होते. महाविकास आघाडी व भाजपने या निवडणुकीत मोठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे प्रथमच या निवडणुकीत चुरस दिसली. पक्षाच्या पदाधिका-यांकडून मतदान प्रक्रियेकडे बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. राहुल कुल, रमेश थोरात, गणेश थोरात व अन्य पदाधिकारी मतदार केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान प्रक्रियेची माहिती घेत होते.

केडगाव येथील मतदान केंद्रावर राहुल कुल व गणेश थोरात यांची भेट झाली. आमदार कुल यांनी थोरात यांना चहा घेण्याची विनंती केली. थोरात यांनीही ती मान्य केली. दोघेही भाजपच्या बुथमध्ये बसले. राजकारण सोडून कौटुंबिक व आरोग्यविषयक चर्चा झाली. काय चर्चा चालू आहे. हे कार्यकर्ते कान देऊन एेकत होते.

यापुर्वी राहुल कुल यांनी एका लग्न समारंभात गणेश थोरात यांना फेटा बांधला होता. कुल यांना कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हा गणेश थोरात यांनी कुल यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या दोन्ही घटनांचा सोशल मीडियावर चांगली चर्चा झाली. गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी सुद्धा निवडणुकीपुरते राजकारण करत इतरवेळी खेळीमेळीचे राजकारण करावे असाच संदेश कुल व थोरात यांनी उपस्थितांना दिल्याचा चर्चा होती.   

(संपादन : सागर डी. शेलार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT