kha.jpg 
पुणे

Video : रात्रीचा पाऊस...अन् तो खड्डा...त्याभोवती ग्रामस्थांची गर्दी...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. १६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटात वादळी पाऊस झाला. पाऊस उघडल्यानंतर कदमवाकवस्ती हद्दीतील पठारे वस्तीमधील एका मोकळ्या मैदानात दोन फूट रुंदीचा व अंदाजे २५ ते ३० खोलीचा खड्डा आढळून आला आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यात दहा फुटाच्या खोलीच्या खाली १५ ते २० खोल पाणी असल्याने, हा खड्डा वीज पडल्याने की आणखी नेमका कसा पडला याची ग्रामस्थांत दिवसभर चालू होती. 

कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीला वादळी वारा व विजेच्या गडगडाटात शनिवारी संध्याकाळी दोन तासांहून अधिक काळ अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षाही वादळी वारा जास्त असल्याने, या परिसरातील काही फ्लेक्स, झाडे तुटून पडली.  

दरम्यान, सकाळी काही नागरीक मोकळ्या मैदानात आले असता, नागरीकांना हा खड्डा आढळून आला. शनिवारी सांयकाळपर्यंत नसलेला खड्डा, रविवारी सकाळी अचानक आढळून आल्याने, रात्री पावसात वीज पडली व वीज पडल्यानेच हा खड्डा पडला असावा ही चर्चा सुरु झाली. त्यातच एका नागरीकाने खड्डा पडल्याच्या ठिकाणी वीज पडताना पाहिल्याचे सांगितल्याने, कदमवाकवस्ती व परीसरातील नागरीकांनी खड्डा पाहण्यासाठी गर्दी केली होती. गावकामगार तलाठी सुजित झांजे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 

याबाबत अधिक माहिती देताना तलाठी सुजित झांजे म्हणाले, ''खड्डा पडलेल्या जागेची माहिती घेतलेली आहे. खड्डा कसा व कधी पडला याची नेमकी माहिती मिळालेली नाही. तसेच या परीसरात पावसामुळे नुकसानही झालेले नाही. मात्र खड्डा कसा पडला याबाबतची माहिती घेण्याचे काम चालु आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT