Biometric Waste Sakal
पुणे

आठ हजार टन जैववैद्यकीय कचऱ्याची पुणे महापालिकेने लावली विल्हेवाट

जानेवारी २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत निर्माण झालेल्या तब्बल ८,०२२ टन जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पुणे महापालिका यशस्वी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराचा वाढता विस्तार, नव्या आरोग्यसुविधा आणि कोरोना (Corona) आपत्ती यांचा एकत्रित परिणाम म्हणून जानेवारी २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत निर्माण झालेल्या तब्बल ८,०२२ टन जैववैद्यकीय कचऱ्याची (biomedical waste) विल्हेवाट (Disposal) लावण्यात पुणे महापालिका (Pune Municipal) यशस्वी झाली आहे. गेल्या साडेचार वर्षांत जैववैद्यकीय कचऱ्यात झालेली ही वाढ २००९ ते २०१६ या आठ वर्षांच्या काळात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या तुलनेत सव्वापट अधिक आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते आहे.

यापैकी गेल्या दीड वर्षाच्या कोरोना आपत्तीकाळातच सुमारे २,५०० टन जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार २००९ मध्ये शहरातील एकूण जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण ३०० टन (प्रतिदिन अंदाजे ८०० किलो) एवढे होते. २०१६ च्या अखेरीस हे प्रमाण साडेचार पटींनी वाढून १,३१६ टन (प्रतिदिन अंदाजे ३,५०० किलो), तर २०२० च्या अखेरीस ते तब्बल सात पटींनी  वाढून २,०१६ टनांवर (प्रतिदिन अंदाजे ५,५०० किलो) जाऊन पोचले. शहरातील जैववैद्यकीय कचऱ्याचे संकलन करून विल्हेवाट लावण्याची २०३९ सालापर्यंतची जबाबदारी ‘पास्को एन्हार्यन्मेंटल सोल्यूशन्स’ या खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे.

पुणे स्टेशनजवळील कैलास स्मशानभूमी परिसरात या कंपनीमार्फत जैववैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते. वैद्यकीय कचरा गोळा करताना त्याचे तीन प्रकार केले जातात. जाळणे आवश्यक असलेला कचरा पिवळ्या रंगाच्या पिशवीतून जमा केला जातो. तुकडे करावा लागणारा, जमिनीत पुरण्याजोगा किंवा पुनर्वापर करता येणारा  कचरा लाल रंगाच्या पिशवीतून गोळा केला जातो, तर तीक्ष्ण किंवा काचेच्या वस्तूंचा कचरा निळ्या अथवा पांढऱ्या पिशवीतून जमा केला जातो. कचरा जाळण्याची (इन्सिनरेशन) ‘पास्को’ची सुरुवातीची स्थापित क्षमता प्रतिदिन चार टन, तर ऑटोक्लेव्हिंगची प्रतिदिन क्षमता १.२ टन इतकी होती. तथापि, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’तर्फे (एमपीसीबी) प्रतिदिन २.७ टन कचरा जाळण्यास व ०.८ टन कचरा ऑटोक्लेव्ह करण्यास ‘पास्को’स मान्यता मिळाली. २०१८ नंतर दररोज निर्माण होणाऱ्या पिवळ्या कचऱ्याचे प्रमाण २.७ टनांच्या पुढे गेल्याने प्रक्रियेसाठी अतिरिक्त कचरा इतरत्र पाठवावा लागत होता. त्यामुळेच ‘पास्को’मार्फत अतिरिक्त क्षमतेसाठी ‘एमपीसीबी’कडे पाठपुरावा सुरू होता. आता दररोज एकूण १४ टन पिवळा व सात टन लाल कचरा यांवर प्रक्रिया करण्यासाठीच्या क्षमतावर्धनाचे काम सुरू आहे.

याअंतर्गत येत्या तीन ते चार महिन्यांत ३०० किलो प्रतितास क्षमतेचे दोन इन्सिनरेटर्स (पिवळ्या कचऱ्यासाठी), ५०० किलो प्रति तास क्षमतेचा श्रेडर व ६०० किलो प्रतितास क्षमतेचे दोन ऑटोक्लेव्ह्ज (लाल कचऱ्यासाठी) कार्यान्वित होतील, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यासह  दहा घनमीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रत्येकी एक ईटीपी (इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लान्ट) व एसटीपी (सिवेज ट्रीटमेंट प्लान्ट) उभारला जाणार आहे.

जैववैद्यकीय कचऱ्याचे  आव्हान गेल्या पंधरा महिन्यांत गंभीर बनले आहे,  परंतु  जैववैद्यकीय कचऱ्याचे वाढते प्रमाण  पाहता, त्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने गेल्या चार वर्षांत ठोस पावले उचलली आणि आता भविष्यातील आव्हाने  यशस्वीपणे पेलण्यासाठी विविध पातळ्यांवर क्षमतावर्धन सुरू आहे.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT