BJP and Shivsena 
पुणे

युतीच्या चर्चेत भोसरीच्या जागेवरून तिढा; शिवसेनेची भूमिका काय?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : युतीच्या चर्चेत भोसरीच्या जागेवरून तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे हा तिढा निर्माण झाला असून भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे.

उदयनराजेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यामार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेकडून भोसरी जागेची मागणी करण्यात आली आहे. सध्या महेश लांडगे भोसरीचे आमदार असून, ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे भोसरीच्या जागेवरून सेना-भाजपमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 'या' तारखेपासून

दरम्यान, आज भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाबाबत बैठक झाली असून ही बैठक मंत्रालयात सुभाष देसाई यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीष महाजन हे उपस्थित होते.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याशी झालेल्या बैठकीचा तपशील चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिला असून भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदलीविषषी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच घटकपक्षांना नेमक्या कोणत्या १८ जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाली.- भाजप सेनेचा जागावाटपाचा फाॅर्म्युला अंतिम झाल्यावरच भाजपचे अध्यक्ष शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT