Pune University Sakal
पुणे

दुरस्थ शिक्षणाद्वारे ‘एमबीए’ प्रवेशासाठी ३१ जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षणाद्वारे (डिस्टन्स एज्युकेशन) दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

मीनाक्षी गुरव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षणाद्वारे (डिस्टन्स एज्युकेशन) दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) दूरस्थ शिक्षणाद्वारे (डिस्टन्स एज्युकेशन) (Distance Education) दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए (MBA) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळा या विभागाअंतर्गत एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दूरस्थ अध्ययन प्रशाळेने नोकरी किंवा व्यवसाय करत एमबीए शिकण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध करून दिली आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून, त्यात चार सेमिस्टरचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांतर्गत प्रवेशासाठी किमान पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे किमान दोन वर्षाचा कामाचा अथवा व्यवसायाचा अनुभव असणारे प्रवेशासाठी पात्र राहतील, असेही विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, आंत्रप्रुनरशिप मॅनेजमेंट, बिझनेस ॲनालिटिक्स, फार्मा ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट, टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, बॅंकिंग मॅनेजमेंट यांसह अन्य विषयांच्या अभ्यासक्रमात एमबीए करणे शक्य होणार आहे. विद्यापीठाने कमी शुल्कात एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती ‘http://unipune.ac.in/SoL/’ या लिंकवर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

SCROLL FOR NEXT