कडूस (पुणे) : संकट कोणतेही असो, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित...पण त्याचा पहिला फटका बसतो तो शेतकऱ्याला. मात्र, तरीही कोणत्याही संकटाला न घाबरता तो इतरांच्या मदतीसाठी सर्वांत पुढेच असतो. सध्याच्या कोरोनाच्या संकटातही शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, तरीही जगाची भूक भागविणारा हा बळीराजा गोरगरिबांच्या मदतीला धावून येत आहे. खेड तालुक्यातील दावडी येथील शेतकरी आत्माराम डुंबरे यांनी तर आपल्या शेतातील पाच टन कोबी पाचशे कुटुंबांना अगदी घरपोच वाटला.
लॉकडाउनमुळे सर्वांनाच फटका बसला आहे. शेतकरीही बाजार बंद असल्याने अडचणीत आहे, तर भाज्या मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत अव्वाच्या सव्वा दर आकारून व्यावसायिक विक्री करत आहेत. मात्र, दावडी येथील शेतकरी आत्माराम डुंबरे यांनी सामाजिक बांधिलकीतून जपत आपल्या शेतातील 5 टन कोबी संतोष सांडभोर, पंचायत समिती सदस्या सुनीता सांडभोर, सचिन वाळूंज यांच्या मदतीने राजगुरुनगर शहर व सातकरस्थळ येथील पाचशे कुटुंबांना घरपोच वाटला.
इतर व्यवसायिकांचीही मदत
राजगुरुनगरमधील "दिनेश इलेक्ट्रॉनिक्स'चे मालक व राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे संचालक दिनेश ओसवाल व सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण, अमर मारणे, जयश्री मुळूक, सुमन सांडभोर यांनी सातकरस्थळ परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या वीस कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य दिले. "वाफगावकर लक्ष्मी ज्वेलर्स'चे मालक माउली वाफगावकर यांनी ठाकरवाडीतील कुटुंबांना किराणा साहित्य, बंदोबस्तावरील पोलिसांना जेवणाचे डबे पोच केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.