EGG.jpg 
पुणे

पुणे : 'या' गावात का केले गेले अंड्यांचे वाटप 

सुदाम बिडकर

पारगाव : कोरोनो विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरु आहे. गरीब कुटुंबातील व्यक्तींची रोग प्रतिकारक्षमता वाढावी यासाठी आहारात खऱ्या अर्थाने पौष्टिक आणि प्रोटीन युक्त पदार्थ जावे म्हणून धामणी (ता. आंबेगाव ) येथे सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीने गरीब कुटुंबाना प्रत्येकी दोन डझन अंड्याचे वाटप करण्यात आले. 

तसेच यावेळी किराणा किट देण्याचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. कोरोनामुळे जगभर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या गोरगरिब मजुरांना कुठलेही काम मिळत नसल्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे धामणी ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन आतापर्यंत अनेक दानशूर व्यक्तिमत्व, सेवाभावी संस्था यांनी जीवनावश्यक वस्तू त्याचप्रमाणे आर्थिक मदत दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

त्यामध्ये पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल १०१ कुटुंबांना अन्नधान्य , टीव्हीएस कंपनी (हरिता), बजाज अर्पन ग्रुप, बबनराव बोराडे, पुनीत बालन ग्रुप, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पिरसाहेब मित्र मंडळ (माळीमळा), राजमाता कृषी बचत गट, नाम फाउंडेशन, परिवर्तन फाऊंडेशन, राष्ट्रवादी पक्ष यांच्या वतीने एकुण 500 कुटुंबांना अन्न धान्य स्वरूपामध्ये वस्तू वाटप केले आहेत.

आज येथील सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने पिरसाहेब यात्रा रद्द करुन गरजु व गरिब 35 कुटुंबांना प्रत्येकी दोन डझन अंडी देण्यात आली याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, अॅड.विठ्ठल जाधव, सरपंच सागर जाधव, तलाठी रवींद्र लोंढे , सुधाकर जाधव, अंकुश भूमकर, पांडुरंग ससाणे, चिंतामणी जाधव, सुखदेव जाधव, गणेश ससाणे, सुरज जाधव आदी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT