पुणे

रेमडेसिव्हिर नसेल तर काळजी नको, टोसिलिझुमॅबचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिरच्या धर्तीवर कोविड रुग्णालयांना टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे वितरण सुरू करण्यात आले आहे. रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्यामुळे टोसिलिझुमॅबची मागणी होत असून, काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातील १०७ कोविड रुग्णालयांना ९८० इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. (Distribution of Tosilizumab Injection as alternative of Remedesivir)

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना रेमडेसिव्हिर वितरित करण्यास सुरवात केली होती. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रेमडेसिव्हिरप्रमाणे टोसिलिझुमॅब इंजेक्शनचीही मागणी वाढत आहे. या औषधाचे उत्पादन देशात होत नाही. त्यामुळे ते सिपला कंपनीमार्फत देशात आयात केले जाते. त्यानंतर केंद्र सरकारकडून राज्यांना टोसिलिझुमॅब इंजेक्शनच्या व्हायल्स पुरवठा करण्यात येतात.

पुणे जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घेउन जिल्हा प्रशासनाकडून वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इंजेक्शनची रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आलेली यादी नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य विचारात घेऊन टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर करण्यात यावा. कोणत्या रुग्णाला हे इंजक्शन द्यावे, याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. तसेच, सरकारने निश्चित केलेल्या दरानेच प्राप्त करून घ्यावेत,’ असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजही बंद राहणार

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT