help2.jpg 
पुणे

रिक्षावाल्या काकांच्या मदतीला धावल्या शिवसेनेच्या वाघिणी 

हरिश शर्मा

खडकी बाजार (पुणे) : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन ही हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. ज्याला त्याला आपला संसार कसा चालेल याची काळजी वाटत असताना खडकीतील रिक्षाचालकांना लॉकडाऊनमध्ये मदतीचा हात देत खडकीतील शिवसेना महिला उपविभाग संघटनेच्या संघटिका वृषाली पवार यांनी भाजीपाला व कांदा प्रत्येक रिक्षास्टॅण्डवर जाऊन रिक्षाचालकांना दिला.              

पवार यांनी स्वखर्चाने भाजीपाला मंडई मधून आणून घरी स्वच्छ निवडून सर्व प्रकारची भाजी एका एका पिशवीत बंद करून सोबत महिला कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक रिक्षा स्टॅण्ड वर जाऊन रिक्षाचालकांना दिला. यावेळी रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसत होते. जेव्हापासून लॉकडाउन सुरू आहे. तेव्हापासून रिक्षा व्यवसाय ही पूर्णपणे बंद आहे.

याकरिता खडकीतील रिक्षाचालकांनी मदत मिळण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत रिक्षाचालकांना कसलीही मदत मिळाली नाही. शिवसेनेच्या वृषाली पवार यांनी फुल नाय फुलांची पाकळी मदत केल्यामुळे रिक्षाचालकांनी शिवसेनेचे व पवार यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT