mask s.jpg 
पुणे

बचत गटातील महिलांना लाॅकडाउनमध्ये मिळाला 'असा' रोजगार

सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : नांदेड सिटी व मगरपट्टा सिटी या दोन प्रकल्पांतील सर्व सदनिका धारकांना मोफत 'वी केअर किट'चे वाटप करण्यात आले. या किटमध्ये चार उच्च दर्जाचे मास्क, एक हॅन्ड सॅनिटायझर बॉटल आणि कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपायांची माहिती व आवाहन पत्रक या बाबींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे सध्या संकटात असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या 'महिला बचत गटांच्या' माध्यमातून मास्क शिवून घेण्यात आलेले आहेत. बारामती, इंदापूर, कर्जत, जामखेड या तालुक्यांतील महिला बचत गटांना यामुळे मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.

तब्बल 85 हजार कुटुंबांसाठी लागणारे मास्क या महिला बचत गटांकडून तयार करून घेण्यात आलेले आहेत. तसेच 'शेतकरी कृती गटांकडून' साखर कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हॅन्ड सॅनिटायझर खरेदी करण्यात आलेले आहे. कोरोना आजाराच्या काळात ग्रामीण भागातील महिला व शेतकरी यांना नांदेड सिटी व मगरपट्टा सिटी प्रशासनाच्या या उपक्रमामुळे खूप मोठा आधार मिळाला आहे. तसेच नांदेड सिटी व मगरपट्टा सिटी येथील रहिवाश्यांनीही आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत.
      

"सामाजिक बांधिलकी म्हणून व नांदेड सिटी आणि मगरपट्टा सिटी येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आलेला आहे. सदनिका धारकांच्या आरोग्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना नांदेड सिटी व मगरपट्टा सिटी या दोन्ही ठिकाणी करण्यात येत आहेत. नागरिकांनीही वैयक्तिक आरोग्याबाबत काळजी घ्यावी व प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे." सतीश मगर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नांदेड व मगरपट्टा सिटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT