District administration officials are resolving the grievances of migrant laborers with the help of NGOs 
पुणे

साहेब, घरातील रेशन संपलेय, साहित्य नाही' ...

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'साहेब, आमच्या घरातील रेशन संपलेय, काहीच किराणा सामान नाही, मदत पाहिजे.... असे एक नव्हे तर शेकडो फोन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षात खणखणत आहेत. गेल्या दहा दिवसांत दीड हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील अधिकारीही त्याची तत्परतेने नोंद घेत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या स्थलांतरित मजूर कामगारांच्या तक्रारी सोडवीत असल्याचे आशादायक चित्र सध्या दिसून येत आहे.
Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागात स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्डही नाही. मजूर अड्ड्यावर किंवा नाक्यावरून जो ठेकेदार कामावर घेऊन जाईल, त्याच्याकडे कामाला जायचे, अशा मजुरांच्या हाताला सध्या काम नाही. रोजगार नसल्यामुळे मजुरांची अवस्था बिकट झाली आहे. अशा मजुरांना आता प्रशासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीशिवाय पर्याय राहिलेला नाही.


बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
खराडी, हिंजवडी, माण, वाकड पिरंगुट, चाकण, खराबवाडी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव, थेरगाव तसेच शहरातील काही भागातून मजूर रेशन आणि किराणा मालासाठी फोन करीत आहेत. एक एप्रिलपासून आजअखेर गेल्या दहा दिवसांत 1 हजार 713 मजूर, कामगारांनी त्यांच्याकडे धान्य नसल्याची तक्रार नोंदविली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 हजार 208 मजूर कामगारांना धान्य, साहित्याचा पुरवठा केला आहे. तर, अन्य 505 मजुरांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. 

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 
नियंत्रण कक्षात तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित भागातील तहसीलदारांना कळविण्यात येते. त्यानंतर तहसीलदार हे तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मजुरांना धान्य व साहित्याची मदत करतात.
- सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष

नियंत्रण कक्ष क्रमांक : 020 - 26111061
मोबाईल क्रमांक :  7517768603

पुणे जिल्ह्यातील एकूण मजुरांची संख्या :  84 हजार 644
ऊसतोड कामगार : 36 हजार 950
खासगी ठेकेदाराकडील मजूर : 4 हजार 305
बांधकाम मजूर : 39 हजार 700
बेघर मजूर, भिक्षेकरी : 3 हजार 689
 : 
ऊसतोड कामगारांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था साखर कारखान्यांकडून करण्यात आली आहे. 7 साखर कारखान्यांनी सुमारे दीडशे कॅम्पमधून त्यांची व्यवस्था केली आहे.
भिक्षेकरी, बेघर मजुरांसाठी 49 कॅम्प आहेत. तर, बांधकाम मजुरांसाठी 285 कॅम्प उभारण्यात आले असून, बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT