Voting 
पुणे

जिल्हा बॅंक निवडणुका तीन महिने लांबणीवर

सकाळवृत्तसेवा

पुणे - कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत निवडणुकीच्या कामांचा व्यत्यय येण्याची शक्‍यता आहे, असे कारण देत राज्य सरकारने राज्यातील २२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आणि ८ हजार १९४ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश सहकार खात्याचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी जारी केला आहे. या आदेशामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूकसुद्धा लांबणीवर पडली आहे. 

कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बॅंकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देणे, कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण, आदी कामे सुरू आहेत. या योजनेचा हेतू थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्‍ती देऊन पुढील खरीप हंगामासाठी कर्ज घेण्यासाठी पात्र करणे असा आहे. त्यामुळे पुढील हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार असल्याने सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि त्यांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा सहभाग अपेक्षित असून, कर्जमाफीच्या कामाचे प्राधान्य विचारात घेऊन सहकार विभागातील बहुतांश अधिकारी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये व्यस्त आहे. ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरणे सुरू झालेले आहे, अशा संस्था वगळून बाकी संस्‍थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचे आदेश काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT