shaniwar wada 
पुणे

चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या

सकाळ डिजिटल टीम

पुणे - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक पर्यटन स्थळे गेल्या 9 ते दहा महिन्यांपासून बंद होती. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. आता पुणे जिल्ह्यात सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके  संग्रहालये खुले करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी मान्यता दिली. परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांनी मंगळवारी आदेश जारी केले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालये 31 मार्च 2020 पासून बंद आहेत. दुर्गप्रेमी आणि पर्यटक जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालयांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणाच्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुले करण्याची सातत्याने मागणी केली जात होती. 

मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करून विविध बाबींना निर्बंधातून वगळले आहे. तसेच, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये खुले करण्याबाबत 4 जून रोजी मानक कार्यप्रणाली लागू केली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालये मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात आली. शारीरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT