Farmer 
पुणे

पीककर्ज वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय केल्या सूचना?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप 2020-21 या वर्षातील खरीप हंगाम कर्ज वाटप आणि मान्सून कालावधीत धरणामधील पाण्याचे नियोजन, उपाययोजना याबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'जिल्ह्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 योजनेतील पात्र खातेदारांच्या यादीतील खाती निरंक झालेल्या आणि न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाध्ये पीक कर्ज देण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी व ग्रामीण भागातील बँकांनी पीक वेळेत पीक कर्जाचे वाटप करावे. तसेच, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप असलेल्या बँकांचा विशेष आढावा घेवून उद्दिष्ट पूर्ण करावे.' 

गतवर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी यांनी धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करुन घ्यावे. विभागातील पाचही  जिल्ह्यांच्या खरिप हंगाम कर्ज वाटपाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Horoscope Prediction : मार्चमध्ये 4 राशींचं नशीब फळफळणार ! शनी महाराज देणार कष्टाचं फळ

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT