Saurabh Rao Sakal
पुणे

विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग

विभागीय आयुक्त राव यांनी यापूर्वीही लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी काही दिवसांनतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झाला असून, सध्या गृह विलगीकरणात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचा (Vaccination) दुसरा डोस घेतला होता. (Divisional Commissioner Saurabh Rao contracted corona second time)

विभागीय आयुक्त राव यांनी यापूर्वीही लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी काही दिवसांनतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी लगेचच दैनंदिन कामकाजाला सुरवात केली होती. मागील शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. या बैठकीस ते उपस्थित होते.

दरम्यान, दोन दिवसांपासून ताप असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. आज सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

राव हे पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करीत आहेत. रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा नियमित पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी दररोज नियंत्रण कक्षात बैठका घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT