Divorce is also taking place in second marriage 
पुणे

‘लग्नाची दुसरी गोष्ट’ही ठरतेय अपयशी! 

सनील गाडेकर

पुणे - अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टही अधुरी राहत असल्याचे प्रकार होत आहेत.  

पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत.  

कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती ॲड. सुनीता जंगम यांनी दिली. 

दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात. 

घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नातही घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. 
- ॲड. सुनीता जंगम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates: बनावट नोकरीच्या जाहिरातींविषयी नागपूर मेट्रोचा इशारा

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

SCROLL FOR NEXT