Tourism sakal
पुणे

Tourism : दिवाळीच्या सुटीत पर्यटनांवर ‘होऊ देत खर्च’!

पर्यटन व्यावसायिकांची ‘दिवाळी’ : हॉटेल बुकिंग, प्रवास महागला तरी उत्साह कायम

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवाळीत सण साजरा करण्यासह उत्साह द्विगुणित करण्यासाठी सुट्यांमध्ये पर्यटनाला जाण्यास अनेक जण पसंती देत आहेत. यंदा दिवाळीपूर्वीच पर्यटनस्थळांवरील विविध बुकिंग फुल झाल्याचे दिसते.

हौशी पर्यटक थंडीचा आनंद घेण्यासाठी उत्तर भारतातील पर्यटनस्थळांना पसंती देत आहेत, तर काहींचा कुटुंबासमवेत समुद्रकिनारी क्षणभर विश्रांती घेण्यावर भर आहे. हॉटेल बुकिंग, प्रवास खर्चात वाढ झाल्याने यंदा पर्यटन महागले आहे. तरी, बुकिंग फुल होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साह असल्याचे चित्र आहे.

कोरोनानंतर गेल्यावर्षी पर्यटन व्यवसायाने काहीसा तग धरला होता. मात्र, यंदा पर्यटन व्यवसायाने खऱ्या अर्थाने उभारी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाचा पर्यटन व्यवसायिकांची दिवाळी आहे. प्रवास खर्च, हॉटेल बुकिंग महागल्याने पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पर्यटकांकडून कुटुंब, मित्र-मंडळींसमवेत दोन ते तीन दिवसांच्या छोट्या सहलींचे किंवा पाच ते दहा दिवसांच्या मोठ्या सहलीचे नियोजन करण्यात येत आहे.

पर्यटनात ‘होम स्टे’लाही पसंती

एक-दोन दिवस सुटी घेऊन शहरानजीकच्या पर्यटनस्थळांवर थोडी विश्रांती घेण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यासाठी मावळ, मुळशी तसेच महाबळेश्‍वर, माथेरान, वाई, पाचगणी अशा पर्यटनस्थळांचे पर्याय निवडले जात आहेत. हॉटेलचे महागडे दर पाहून अनेक जण ‘होम स्टे’ला पसंती देत आहेत. खासगी कंपनीत काम करणाऱ्या स्नेहा टिळेकर म्हणतात, ‘आम्ही सुटीत पर्यटनासाठी जाताना फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्यूबवरील रिव्ह्यूज्‌ तसेच मित्र-मैत्रिणींचे अनुभव पाहून ‘होम स्टे’चा पर्याय निवडतो.’

या पर्यटनस्थळांना पसंती

  • पुणे - मावळ, मुळशी, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान

  • महाराष्ट्र - दापोली, दिवेआगर, तारकर्ली, सिंधुदुर्ग, श्रीवर्धन, हरिहरेश्वर

  • भारत - राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, आसाम, केरळ, गुजरात, कर्नाटक

  • जग - दुबई, मालदिव, बाली, सिंगापूर, भूतान, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, कंबोडिया, जॉर्जिया

पर्यटन महाग होण्याची कारणे

  • प्रवास खर्चात वाढ

  • शेवटच्या टप्प्यात विमान प्रवासाच्या किमतीत वाढ

  • हॉटेल बुकिंग पॅकेजमध्ये वाढ

  • राहण्या-खाण्याचा खर्च वाढला

यंदा पर्यटन महागले असले, तरीही पर्यटनाचे सुयोग्य नियोजन केल्यास कमी खर्चात चांगले पर्यटन करता येते. याशिवाय एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढताना पर्यटकांनी अन्य शहरातून जाणाऱ्या ‘कनेक्टिंग विमान’ प्रवास निवडावा. जेणेकरून अन्य शहरांमध्येही छोटेखानी सहल करता येते. यंदा सिंगापूर, दुबई यांसह पर्यटक युरोप, व्हिएतनाम, फिलिपिन्स, कंबोडिया येथे जाणे पसंत करत आहेत. याशिवाय नॉर्दर्न लाइटस्‌ पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे.

- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT