Muley.jpg 
पुणे

मनाचिये वारी : वारीतील सकारात्मक तत्त्व आधुनिक युगात अंगीकारावे

ज्ञानेश्वर मुळे

Wari 2020 : पंढरीची आषाढी वारी ही सामूहिक पूजा आहे. सर्व समाजातील सुमारे दहा लाख वारकरी एका विचाराने, एकाच ध्येयासाठी वाटचाल करतात, तेव्हा तो भक्तियोग होतो. नामसंकीर्तनातून व्यक्त होणारी आर्तता समानच असते, त्यामुळे वारीतून संस्कृतीची भावमुद्रा प्रकटते. आजही समाजरचनेत जातिधर्माच्या भिंती आहेत; परंतु वारीची वाट त्याला अपवाद आहे. इथे पंढरीचा विठ्ठलच साऱ्या समाजातील लेकरांना एकत्रित चालण्याची बुद्धी देतो. वारीत जातिपातीच्या व्यवस्थेला थारा दिला जात नाही, त्यामुळेच वारी आध्यात्मिकतेचे एक सुंदर प्रतीक ठरते. येथे सर्व विसरून वारकरी केवळ पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची इच्छा धरतात, हे प्रत्येकाच्या आध्यात्मिक तृष्णेचे प्रतिबिंब आहे. वारीत प्रत्येक जण बाह्यसुखापेक्षा स्थायीसुखाचा शोध घेण्याची वृत्ती जोपासतो, त्याचेच वारी हे सकारात्मक प्रतिबिंब आहे.

पण, वारकऱ्यांना वारीतच विठ्ठल भेटतो असे नाही. विठ्ठल अखंड वारकऱ्यांमध्येच रमत असतो, त्यामुळे वारकरी वारीत भजन करो अथवा घरी, पांडुरंग त्यांच्याजवळच असतो. वारकरी शुद्ध विचार आणि आचार जगतात, त्यांचा भाव अतिशय निरागस आणि शुद्ध असतो. वारी रद्द झाल्यामुळे प्रत्येक वारकऱ्यास दुःख होणे स्वाभाविक आहे. पण ते जेथे असतील, तेथे पांडुरंग असतोच, यात शंका नाही. त्यांनाही त्याची कल्पना असते.
वारीत अध्यात्म जगायला मिळते. सध्याच्या काळात त्यात विज्ञानानेही शिरकाव केला आहे, त्यामुळे आगामी काळात आध्यात्मिक वारीबरोबर ती विज्ञानवारी करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन व शिक्षणासाठी वारीसारखे मोठे व्यासपीठ नाही. वारकरी संप्रदायाच्या रूपाने ऊर्जेची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. तिची सकारात्मक तत्त्वं आधुनिकतेत अंगीकारल्यास त्याचा समाजाला निश्‍चित चांगला उपयोग होईल.

(शब्दांकन : शंकर टेमघरे)


""माउलींचा पालखी सोहळा रद्द झाल्याने वारीतील सद्विचारांच्या सुसंवादाला आम्ही मुकलो आहोत. कोरोनाच्या महामारीला लवकरात लवकर घालविण्याचे मागणे संतांकरवी देवाला सांगूया.''
- मनोहर महाराज भगत, नातेपुते  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT