UPSC Students Rights has demanded arrangement for students the health check-up and to return to the village 
पुणे

Corona Virus : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावी परत जाऊ द्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून गावी परत जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी यूपीएससी स्टुडंट्स राइट या संघटनेने केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे, की पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी राहतात, परंतु सध्या लॉकडाऊन घोषित केल्यामुळे यातील अनेक मुले व मुली पुण्यात अडकले आहेत. हॉटेल, मेस बंद असल्याने त्यांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील अनेकजण आर्थिक विवंचनेत आणि विशेषतः मुली मानसिक तणावाखाली आहेत.

- मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणे एकाला पडले महागात

राजस्थानमधील कोटा इथे प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राहत आहेत. सध्या तेथेही लॉकडाऊन घोषित केल्याने  विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना परत आणण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने विशेष तीनशे बसची व्यवस्था केली. प्रत्येक बसमधून 25 विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाणार आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिलाला आहे.

सोशल मीडियावर 'आपलं घरं, आपली वसुंधरा' चा ट्रेंड

पुण्यामध्ये अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तर प्रदेश सरकार प्रमाणेच घरी परतण्याची व्यवस्था करावी. सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने सर आपणांस विनंती करण्यात येते की, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्याची परवानगी द्यावी आणि त्यासाठी व्यवस्था करून त्यांना दिलासा द्यावा, महेश बडे, किरण निंभोरे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT