Eyes Sakal
पुणे

बुरशीच्या उपचारात डोळ्यांचा बळी नको

देशभरात आता म्युकरमायकोसिसचे रूग्ण वाढत असून, उशिरा निदान झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - म्युकरमायकोसिसमध्ये (Mucormycosis) चेहऱ्यावरील बुरशी (Fungus) शस्त्रक्रियेद्वारे (Surgery) बाहेर काढावी लागते. अशा वेळी डोळा, (Eye) जबडा, दात असे अवयवही काढण्याची वेळ येवू शकते. काही वेळा तर रुग्णाचा (Pateint) जीव वाचविण्यासाठी घाईगडबडीत किंवा निष्णात डॉक्टरांच्या (Doctor) अभावी विनाकारण डोळा काढला जातो. परंतु, योग्य शस्त्रक्रिया केल्यास डोळा वाचवता येतो. प्रत्येकवेळी डोळ्याचा बळी नको, असे मत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांनी व्यक्त केले. (Do not Sacrifice the Eyes to Treat the Fungus)

देशभरात आता म्युकरमायकोसिसचे रूग्ण वाढत असून, उशिरा निदान झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते. मुळात अतिशय दुर्मिळ असलेल्या या आजाराबद्दल डॉक्टरांसह प्रशासनालाही कमी माहिती होती. मात्र, आता याबद्दल जनजागृती झाली असून, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉ. मूर्ती हे पुण्यातील रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या डोळ्यासंबंधीच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहे. त्यांना आजवर आलेल्या अनुभवाच्या आधारे आणि डॉक्टरांशी झालेल्या चर्चेतून त्यांनी काही तथ्ये समोर मांडली आहेत.

डॉक्टरांनी पुढे येणे आवश्यक

बुरशीच्या आजारासंबंधी रोज नवी तथ्ये समोर येत आहे. अशा वेळी डॉक्टरांच्या समुदायाने स्वतःला लवकर अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवीन संशोधन आणि तथ्ये मांडणे गरजेचे आहे. यातून उपचारपद्धती अधिक शास्त्रीय होईल, त्याचबरोबर अनेकांचे प्राण वाचतील, असे मत तज्ज्ञांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

समज-गैरसमज

गैरसमज

  • म्युकरमायकोसिसच्या प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात

  • बुरशी डोळ्यापर्यंत पोचल्यावर

  • दृष्टी जाते

  • डोळ्यापर्यंत बुरशी पोचल्यास शस्त्रक्रिया आवश्यकच

  • डोळ्याला सूज आली म्हणजे रोग हाताबाहेर गेला

  • डोळ्याशी निगडित समस्या औषधोपचाराने सुटत नाहीत

  • ‘सायनस’ची समस्या सोडवली तरीही डोळ्याची समस्या सुटत नाही

तथ्य

  • बहुतेक रुग्णांमध्ये डोळे काढण्याची गरज नाही. तसेच प्रत्येकवेळी डोळे काढून फायदा होईलच असेही नाही.

  • बहुतेक वेळा डोळ्यापर्यंत जाणाऱ्या नसा बंद झाल्यामुळे दृष्टी जाते. खरेतर बहुतेक रुग्णांमध्ये बुरशी डोळ्यात पोचत नाही.

  • शस्त्रक्रियेव्यतिरिक्त आपल्याकडे असे इंजेक्शन उपलब्ध आहे. ज्याद्वारे बुरशीची वाढ रोखता येते आणि डोळा वाचविता येतो.

  • बहुतेक वेळा डोळ्याशेजारच्या भागात बुरशी वाढलेली असते. याचा अर्थ ती डोळ्यात पोचली असा नसतो.

  • डोळ्याजवळ आलेली सूज औषधांनी आणि इंजेक्शनने कमी होऊ शकते. ॲन्टीफंगल औषधांच्या वापराने बुरशीची वाढ थांबवता येते.

  • सायनसमधील बुरशी व्यवस्थित काढल्यास चेहऱ्यावरील बुरशीचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्याचा थेट फायदा डोळ्यांना होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

Pune Crime : फेसबुक पोस्टवरून महिलेला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Sikandar Shaikh Arrested : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक; राजस्थानातील कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT