pirangut
pirangut 
पुणे

पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान... 

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : पुणे- कोलाड रस्त्यावर चांदणी चौक ते ताम्हिणी घाट या दरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ अपुऱ्या, अर्धवट व नियोजनशुन्य कामांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर वर्षभरात शेकडो अपघात झाले असून, किमान तीसहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये स्थानिकांचा समावेश सर्वाधिक असल्याने अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. 

एक ना धड भाराभर चिंध्या अशी या रस्त्याची अवस्था झाली असून, कायमस्वरुपी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी या रस्त्यालगतच्या ग्रामपंचायती, रस्ते महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस खाते व तहसील कार्यालय यांच्यात समन्वय राखून संयुक्त कार्यवाही होणे अपेक्षित आहे. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

चांदणी चौक ते ढोकळवाडी या दरम्यान सर्वच ठिकाणी या रस्त्याची कामे अर्धवट व अपुरी आहेत. ही कामेही अर्धवट, अपुरी व नियोजनशून्य आहेत. या सिमेंटच्या रस्त्याला सर्वच ठिकाणी धारदार उंबरे तयार झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी या उंबऱ्यांवरून वाहने घसरतात. रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने वाहने उंबऱ्यावर धडकतात व अपघात होतात. साईडपट्टी आणि सिमेंट रस्त्याची लेन या दरम्यान जो नियोजित रस्ता आहे, त्या रस्त्यावरही जागोजागी दगड, मुरमांचे ढीग व अन्य राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक या नियोजित कच्च्या रस्त्याने जातात आणि दगड व राडारोड्यात अडकल्याने अपघात होत आहेत. 

काम चालू असताना या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यासाठी या रस्त्यावर दगडी, लाकडे, लोखंडी वस्तू ठेवलेल्या होत्या. सध्या हा रस्ता वाहतुकीला खुला केला, तरी त्यावरील लाकडे, दगड व अन्य वस्तू तशाच इतरत्र अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याने अपघात होत आहेत. अनेक ठिकाणच्या मोऱ्यांची कामेही अर्धवट असून, त्यांचे लोखंडी गज व सळया धोकादायक अवस्थेत आहेत. रुंदीकरणासाठी ठिकठिकाणी लगतची झाडे तोडली असून, त्याच्या फांद्या व मोठमोठे ओंडके रस्त्यावरच असल्याने अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत.

पिरंगुट घाट ते कासार आंबोली येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा या दरम्यान या रस्त्याचे कोणतेही नवीन काम हाती घेतलेले नाही. सैनिकी शाळेसमोर गोकुळ मंगल कार्यालयाच्या परिसरात तीव्र व इंग्रजी एस आकाराचे वळण आहे. सुतारवाडीच्या बाजूला चढावर कायम पाणी साचलेले असते. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी रस्ता उखडलेला असतो. शिंदेवाडी येथील दुर्वा हॅाटेलसमोरील रस्त्यावरचा खड्डा बुजविण्य़ासाठी गेल्या पावसाळ्यात सिमेंट व खडीचे मिश्रण टाकले होते. मात्र, त्यावेळी त्यावरून वाहन गेल्याने त्या ठिकाणी वेडावाकडा खड्डा तयार झाला असून, या खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचा वारंवार अपघात होत आहेत. दारवली हद्दीतील घाट रस्त्याच्या तीव्र वळणावर व उतारावर दक्षिणेकडील बाजूचे गटार वाहून गेल्याने मोठा खड्डा झाल्याने अपघात वारंवार होत आहेत.

सध्या भूगाव येथील गारवा हॅाटेल ते भुकूम येथील खाटपेवाडी फाटा या दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंच्या लेन पूर्ण झालेल्या आहे. मात्र, अन्य ठिकाणी सध्या या रस्त्याची एकच लेन सिमेंट कांक्रीटमध्ये बांधण्यात येत आहे. ही एकेरी लेनही  अनेक ठिकाणी अर्धवट व अपुरी आहे. रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पावसाळ्यापूर्वी चांदणी चौक ते माले या दरम्यानच्या रस्त्याची किमान एक लेन तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी वळण, उतार, मोरी व अरुंद धोकादायक रस्ता आहे, त्या ठिकाणी रेडियमचे सूचना फलक तातडीने उभारणे अत्यावश्यक आहे.

या उपाययोजना करा
 - रस्त्याच्या किमान एका लेनचे काम तातडीने पूर्ण करा.
 - या रस्त्यावरील सिमेंटच्या रस्त्यामुळे तयार झालेले धारदार उंबरे व त्याच्यापुढील खड्डा बुजवावा. 
 - साईडपट्टी आणि सिमेंट रस्त्याची लेन या दरम्यानच्या नियोजित रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेले दगड, मुरुम व अन्य राडारोडा बाजूला करावा. 
 - रस्त्यातच असलेली तोडलेली झाडे तातडीने दूर करावीत.  
 - मोऱ्यांच्या कामांच्या ठिकाणी लाल फलक अथवा रेडियमचे फलक लावावेत. 
 - रस्त्यावरील धोकादायक अवस्थेतील लोखंडी गज, सळया व अन्य वस्तू व्यवस्थित लावाव्यात.   
 - पावसाचे पाणी रस्त्यात साचून राहणार नाही, याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT