पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताय का? मग ही बातमी नक्की वाचा

सावता नवले

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या साईटपट्टयांचा मुरूम वाहून गेल्याने व रस्ता खराब झाल्यामुळे डांबरखडीचा नवीन लेअर टाकल्याने रस्त्याला धोकादायक कठडे तयार झाल्याने दुचाकी घसरून वारंवार अपघात होत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गाचे रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती. त्यामुळे पुन्हा खड्डे पडत होते. खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे टोलवसुली करणाऱ्या कंपनीने नुकतेच भिगवण ते पाटसदरम्यान संपूर्ण रस्त्यावर टप्प्याटप्याने नवीन डांबरखडीचा सहा ते आठ इंच उंचीचा लेअर टाकण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूचा मुरूम वाहून गेल्याने व काही ठिकाणी खचल्याने रस्त्याला सगळीकडे उंच कठडे तयार झाले आहेत. त्यामुळे दुचाकी रस्त्यावरून खाली व वर घेताना घसरून अपघात होत आहेत. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. दोन ठिकाणी दुचाकी रस्त्यावर घेत असताना घसरल्याने पाठीमागून घेणाऱ्या वाहनं अंगावरून गेल्याने प्राण गमवावे लागले आहेत. तर रस्त्यावरून अवजड वाहने खाली घेताना कठडयामुळे उलटून वाहने व मालाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे साईटपट्टयाचा मुरूम वाहून गेल्याने व नवीन लेअरमुळे काही ठिकाणी अर्ध्या तर काही ठिकाणी एकदीड फुटाचे कठडे तयार झाले आहेत. त्यामुळे रस्ता दुचाकी प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. आणखी अपघातांची वाट न पाहता संबंधितांनी साईटपट्टयांना मुरूम टाकून रोलींग करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक व दुचाकी प्रवाशांकडून होत आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT