porsche motors pune accident esakal
पुणे

Pune Porsche accident : ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेसह तिघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात पोलिसांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्यासह तिघांना सोमवारी (ता. २७) अटक केली. न्यायालयाने या आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कल्याणीनगर येथे रविवारी (ता. १९) भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेने फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय अनिरुद्ध तावरे (वय ३८, रा. कॅम्प, पुणे), मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी भीमराव हाळनोर (वय ३५, बी.जे. वैद्यकीय मुलांचे वसतिगृह, पुणे) आणि शवागारातील कर्मचारी अतुल नामदेव घटकांबळे (वय ३०, रा. सोमवार पेठ) या तिघांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. या तीन आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

या तीन आरोपींनी अल्पवयीन मुलाला न्यायालयीन प्रक्रियेत मदत होण्याच्या उद्देशाने शासकीय पदाचा गैरवापर केला. तसेच, मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केला. आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी कोणाच्या रक्ताचा नमुना घेतला? या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याशी डॉ. तावरे यांचा आर्थिक व्यवहार झाला असून, या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयासमोर केली. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

डॉ. तावरेंच्या सांगण्यावरून रक्ताचा नमुना बदलला

पोलिसांनी या तीन आरोपींच्या फोनचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले. आरोपी अतुल घटकांबळे ससून रुग्णालयातील शवागारात शिपाई आहे. डॉ. अजय तावरे यांनी घटकांबळेला फोन केला. त्यानुसार तो डॉ. श्रीहरी हाळनोरकडे वॉर्ड क्रमांक ४० मध्ये गेला. त्याने रक्ताचा नमुना बदलण्याचा डॉ. तावरेंचा निरोप डॉ. हाळनोर यांना दिला. त्यानुसार डॉ. हाळनोर यांनी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यानंतर डॉ. हाळनोर यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना घेऊन तो डस्टबिनमध्ये फेकून दिला. त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेऊन फॉरेन्सिक विभागाकडे पाठवल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या वेळी ससून रुग्णालयात डॉ. हाळनोर यांच्या कक्षात आणखी एक व्यक्ती होती. ती व्यक्ती कोण, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

आरोपींकडून तीन लाखांची रोकड जप्त

घटकांबळेने एका व्यक्तीकडून घेतलेली रक्कम डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना दिली. तर, काही रक्कम स्वत:कडे ठेवल्याचे तपासात समोर आले होते. डॉ. हाळनूरच्या घरातून अडीच लाख रुपये आणि घटकांबळेकडून ५० हजार रुपये अशी एकूण तीन लाखांची रोकड जप्त केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT