Doctor Attacked One Person in Wagholi esakal
पुणे

आर्थिक व्यवहारातून चक्क डॉक्टरचा एकावर जीवघेणा हल्ला; लाथाबुक्क्यांनी मारहाण, आई-वडिलांसह पत्नीला केली शिवीगाळ

Lonikand Police : या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आर्थिक व्यवहाराच्या वादातून डॉ. गुप्ता हे साथीदारासह बाफना यांच्या घरी गेले. त्यांच्या आई-वडील व पत्नी यांना शिवीगाळ केली.

वाघोली : आर्थिक व्यवहारातून चक्क एका डॉक्टरनं (Doctor) दोन साथीदारांच्या मदतीनं गुरुवारी रात्री एकावर हल्ला केल्याची गंभीर घटना वाघोलीत घडली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितेश प्रकाश बाफणा (वय ३६, रा. वाघोली) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी जीवन रक्षक हॉस्पिटलचे डॉ. विवेक गुप्ता, अजय सावंत, प्रशांत ढमढेरे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या वादातून डॉ. गुप्ता हे साथीदारासह बाफना यांच्या घरी गेले. त्यांच्या आई-वडील व पत्नी यांना शिवीगाळ केली. बाफना यांच्या कारला कार आडवी लावून त्यांच्या कारवर दगडफेक केली.

तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घटना घडल्यानंतर लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे यांनी घटना स्थळी भेट दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस (Lonikand Police) करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT