The doctor threatened nurse to leave room for demanding for a safety kit In pune 
पुणे

पुण्यात डॅाक्टराकडून नर्सना धमकी: व्हिडिओ व्हायरल

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत असताना दुसरी एका डॅाक्टरचा नर्सशी वागण्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ''काम जमत नसेल तर रूम खाली. तुमचे सामान मी बाहेर फेकून देतो''अशी धमकीच हा डॅाक्टर देत आहे. त्यामुळे कोरोना वॅारिअर्स ठरणाऱया डॅाक्टराच्या अशा वागणुकीमुळे मुलींवर शेवटी काम सोडण्याची वेळी आली आहे. पुण्यातील गणेश पेठेतील हॅास्पिटलमधील हा प्रकार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  


या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या पाच नर्स मुली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी येथील आहे. कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे त्यांना कुटुंबीयांकडून सुरक्षितता बाळगण्याचे वारंवार फोन येत आहेत. तसेच या मुलींचे आई वडील डॅाक्टरांना फोन करून मुलींना घरी सोडण्याची विनंती करत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

''आमच्या मुलींना कोरोनाची लागण झाल्यास जबाबदार कोण?'' असा सवाल त्यांनी डॅाक्टरला विचारल्याने डॅाक्टर चांगलेच संतापले. त्यांनी या सर्व मुलींना जमत नसेल तर काम सोडण्याचे आणि लगेच रूम सोडण्याचे अजब फर्मानच सोडले. 'तुमच्या आई वडिलांना काय कळते. त्यांनी घरी भांडीच घासावी. मला शिकवू नये. त्यांचे मला काही सांगू नका. उद्या सकाळपर्यंत रुम खाली करा, असा दम भरून त्या डॅाक्टरने मुलींच्या आई वडिलांना अश्लिल शिवीगाळ केली आहे. त्यामुळे मुलींना काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  या घडनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

घसा ओला करण्यासाठी तळीरामांची झुंबड, लॉकडाऊनचा फज्जा

कोरोनामुळे सध्या डॉक्टर, नर्स यांना सध्या सर्वात जास्त वेळ काम करावे लागत आहे. दरम्यान, कोरोनाच्या भीतीसोबत त्यांना वेगवेगळ्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. या प्रकाराबाबत संबंधित डॅाक्टरची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना फोन नेटवर्क बाहेर लागला.

होय,  पुण्यात दारू मिळविण्यासाठीच मिळताहेत पैसे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT