corona Sakal Media
पुणे

सौम्य लक्षणांसाठी घ्या डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला

कोरोना बाधितांसाठी ससूनच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम.

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना बाधित पण सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत ऑनलाईन सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांनी हा उपक्रम सुरू केला आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सात यावेळेत ही सुविधा पुरवत असल्याचे डॉ. मृण्मयी मांगले यांनी सांगितले.

कोरोना बाधितांपैकी ८० टक्के रुग्णांना फक्त सौम्य लक्षणे असतात. अशावेळी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरीच उपचार घेतल्यास आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि सर्वांना योग्य उपचार मिळतील. हा उपक्रम राबविणाऱ्या हेल्थकॉप प्रायव्हेट लिमिटेड कम्पनीच्या संचालक डॉ. मांगले म्हणाल्या,"ससून अर्थात बी.जे. मधून शिक्षण पूर्ण करून बाहेर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये रुग्णांना मोबाईल कॉल वर मोफत सल्ला देण्यात येणार आहे. तसेच यासंबंधीची औषधे आणि चाचण्या घरच्या घरीच पुरवता येतील का असा आमचा विचार आहे." 'हेल्पकॉप इ क्लिनिक' नावाने हा उपक्रम सुरू आहे. रुग्णांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. यावर फोन केल्यानंतर रुग्णच्या आरोग्याच्या स्थितीच्या आधारे थेट तज्ञ डॉक्टर सल्ला देणार आहे. मराठा अंथर्योप्रेनर असोसिएशनचे याला सहकार्य आहे.

हेल्पलाईन क्रमांक :

(सकाळी ९ ते सायंकाळी ७)

9822491691

संकेतस्थळ :

www.healthcop.in/digital-clinic/#

पुणे शहरातील नागरिकांसाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध केली आहे. गृहविलागीकरणात सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी मोफत सल्ला डॉक्टर देणार आहे.

- डॉ. मृण्मयी मांगले, संस्थापक संचालक, हेल्थकॉप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT