पुणे

देहूत खड्ड्यात पुरलेले अर्भक नसून कुत्रे 

सकाळ वृत्तसेवा

देहू -  येथील जुन्या म्हाळुंगे रस्त्यावर अनोळखी व्यक्तीने कपड्यात गुंडाळून संशयास्पद काहीतरी पुरल्याची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे शनिवारी (ता. 29) रात्रीपासून देहूरोड पोलिस व महसूल विभागाची पळापळ सुरू झाली. रविवारी (ता. 1) सकाळी पुरलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोदले असता, तेथे मृतावस्थेत कुत्रे आढळले. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

त्या वेळी तेथे खड्ड्याच्या बाजूला महिलेचा स्कार्प व इतर साहित्य आढळले. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने घटनास्थळी रात्रभर दोन पोलिसांना बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले; तसेच या घटनेची माहिती महसूल विभागाला कळविण्यात आली. त्यानुसार रविवारी दुपारी महसूल विभागाचे प्रभारी नायब तहसीलदार अंकुश आटोळे, मंडल अधिकारी जी. एफ. सोमवंशी, गावकामगार तलाठी अतुल गीते, पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक ढाया बोरकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रणजित कांबळे घटनास्थळी दाखल झाले. तेथे खोदले असता मृतावस्थेत कुत्रे आढळले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT