Dr Pandit Vidyasagar Sakal
पुणे

तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका - डॉ. पंडित विद्यासागर

तंत्रज्ञानाचा अतिवापर केला, तर त्याचे दुष्परिणाम होतात. सौर ऊर्जेचा जास्त वापर कसा करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरुणांनी या क्षेत्रात संधी शोधल्या पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘विज्ञान (Science) व तंत्रज्ञानाच्या (Technology) माध्यमातून विकास (Development) साधणे गरजेचे आहे. यामुळे तंत्रज्ञान वापरल्याशिवाय आज पर्याय (Option) नाही. तंत्रज्ञानाचे गुलाम (Slave) नव्हे, तर मास्टर व्हा,’ असा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक डॉ. पंडित विद्यासागर (Dr Pandit Vidyasagar) यांनी दिला. (Dont be a slave to technology Dr Pandit Vidyasagar)

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त गुगल मिटद्वारे ‘यिन’च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, ‘जे आपल्याला शक्य आहे ते स्वतः करायला हवे. तंत्रज्ञानामुळे आपला वेळ वाचला, पण तो वेळ त्यापेक्षा जास्त तंत्रज्ञान अजून विकसित कसे करता येईल का, हे पाहण्यात घालवावा. तंत्रज्ञानाच्या मोठ्या संधींना सोबत घेऊन पुढे जायचे आहे.’

तंत्रज्ञानाचा अतिवापर केला, तर त्याचे दुष्परिणाम होतात. सौर ऊर्जेचा जास्त वापर कसा करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरुणांनी या क्षेत्रात संधी शोधल्या पाहिजे. तंत्रज्ञानाचा विकास झाला की, देशसुद्धा विकसित असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात शिक्षण ऑनलाइन झाले आहे. मात्र, यामुळे व्यवहार ज्ञानाकडे कल कमी होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाने कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली आहे; पण मानवी मेंदूची क्षमता कमी होताना दिसून येत आहे. तंत्रज्ञानमुळे क्षमता विकसित व्हावी; पण त्याचा ऱ्हास होता कामा नये.’’ प्रास्ताविक विद्यार्थी सचिन रानवडे यांनी केले. आभार सृष्टी मोरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT