baramati sajak
पुणे

Ayodhya Ram Mandir : डोर्लेवाडी परिसर झाला रामनामाने भक्तिमय

अखंड राम नाम जप,कीर्तन, भजन, भव्य मिरवणूक,अन्नदान आदी धार्मिक कार्यक्रमांनी डोर्लेवाडी (ता. बारामती) परिसरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न झाला. अवघा परिसर रामनाम जपाने भक्तिमय झाला होता.

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी : अखंड राम नाम जप,कीर्तन, भजन, भव्य मिरवणूक,अन्नदान आदी धार्मिक कार्यक्रमांनी डोर्लेवाडी (ता. बारामती) परिसरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न झाला. अवघा परिसर रामनाम जपाने भक्तिमय झाला होता. डोर्लेवाडी येथील संत सावता महाराज मंदिरात श्रीराम जप संकुल यांच्या वतीने पहाटेपासून अखंड १४ तास रामनाम जपाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी बाळासाहेब महाराज नाळे यांचे कीर्तन झाले.कीर्तना नंतर मंगल अक्षदा वाहण्यात आल्या.उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सांप्रदायिक भजनी मंडळ यांनी कीर्तन साथ केली. रात्री भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

सोनगाव (ता.बारामती) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. साडे बारा वाजता महाआरती करून मंगल अक्षदा वाहण्यात आल्या त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मंदिरात दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुणवडी (ता. बारामती) येथील हनुमान मंदिरात दुपारी अखंड जप यज्ञ, भजन, आरती झाली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.रात्री टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

झारगडवाडीत एका महिन्यात मंदिराची उभारणी व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पूर्ण..

येथील होलार समाज संघटना व ग्रामस्थांच्या वतीने मागील वर्षी राम मंदिर बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र २२ जानेवारी या दिवशी आयोध्या येथे बांधण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीराम यांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर २२ डिसेंबर रोजी मंदिर बांधण्यास सुरुवात करण्यात आली,आणि अवघ्या एका महिन्यात आकर्षक अशा श्रीराम मंदिराची उभारणी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून करण्यात आली.

गेल्या तीन दिवसांपासून मिरवणूक कीर्तन,भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर आज प्रत्यक्षात अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधत या मंदिरात देखील श्रीराम,लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रात्री निलेश महाराज माळशिकारे कोर्हाळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT