Wari
Wari 
पुणे

वसे अंतर्यामी पांडुरंग

डॉ. मृदुला कुलकर्णी (खैरनार)

नुकतेच ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान झाले. मजल दरमजल करीत आषाढ शुद्ध नवमी वाखरीमध्ये सर्व पालख्यांचे भेटणे आणि शुद्ध दशमीला मोठ्या थाटामाटात विठुरायाच्या पंढरीत प्रवेश! मोठा दिमाखदार सोहळा. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचा. पण, यावर्षी कोरोनाची साथ आली आणि सगळी वेळापत्रकेच बदलली. सुरुवातीला छान वाटलेली सुट्टी नंतर नकोशी वाटू लागली, आर्थिक घडी विस्कटली, आरोग्याचा काय कोणाच्याच जीवाचा हवाला राहिला नाही...थैमान नुसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे! या पार्श्वभूमीवर बघता बघता वारीचा प्रश्न आला. तत्पूर्वी, देवस्थाने व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय झाल्याने देऊळ बंदच आहे. यावर्षीची सुरुवातीची चैत्री वारी पण झालीच नाही. पण आषाढी वारी म्हणजे अवघ्या विठ्ठलभक्तांचा श्वास! त्यावरच आलेली गदा! वारीत होणारी गर्दी, शिस्तबद्ध असले तरी वेगवेगळ्या गावावरून येणाऱ्या दिंड्या, त्यामधील जास्त लोकांचा सहभाग, एकत्र राहणे सगळेच मुद्दे कोरोना शिस्तीच्या विरोधातले! मग हे गणित कसे जमायचे?

पण मग यासाठी शेकडो वर्षांची परंपरा खंडीत करायची? भलताच क्लिष्ट झाला हा विषय! मग शेवटी निरनिराळे संप्रदाय, मठाधिपती, वारकरी त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणा, आरोग्याधिकारी या सगळ्यांशी चर्चा विनिमय करून शासनाला निर्णय द्यावाच लागतो तो दिला. कितीही वेगळा, मनात सुद्धा येणार नाही, असा असला तरी तो सर्वांना मान्य करून घ्यावाच लागला...प्रश्न जीवाचा...आपल्या आणि दुसऱ्याच्या! पंढरीनाथाने तरी वेगळे काय सांगितलेय हो, त्याने कधीच स्वतःचे स्तोम माजवले नाही. अठरापगड जातीचे सर्व भक्त हे त्याचे लाडकेच होते आणि भक्तांच्या कल्याणासाठी तो विठुराया सदैव विठेवरी तत्पर असतो.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा !!  

संत शिरोमणी तुकारामांचे हे भजन आपल्याला हेच सांगत आहे. 
निरनिराळ्या संतांना, भक्तांना जेव्हा संकटांमुळे अथवा काही समस्यांमुळे विठ्ठलाचे चरणी येता आले नाही तेव्हा तेव्हा पांडुरंग अशा भक्तांसाठी धावून गेलेला आहे हे आपल्याला नवीन नाही. संत वाड्मयात असे दाखले पावलोपावली आढळतात. मग, आता पांडुरंग दुसरे काय सांगणार? सर्व भक्तजनांची कैवारी अशी प्रेमळ विठू माऊली आजही हेच सांगतेय...बाबांनो माझ्याकडे येण्याचा अट्टाहास करू नका. त्यापायी जीवाशी खेळ करू नका...त्यापेक्षा माझे नाम घेत जेवढ्या म्हणून लोकांना संकटात आरोग्य, उपचार, अन्न, पाणी, वाहन या द्वारे मदत करता येईल तेवढी करा...त्या प्रत्येकात मी आहेच! अशाप्रकारची मदत करणारा प्रत्येक भक्त ही माझेच रूप आहे! मी म्हणजेच माझा नामा, माझा तुका, माझा ज्ञाना. तर मी म्हणजेच माझा लाडका वारकरी. हे अद्वैताचे नाते आपल्याला नवीन नाही!
संत एकनाथांनी म्हणलेच आहे.
राजा त्रैलोक्याचा गुरु राज स्वामी, वसे अंतर्यामी पांडुरंग
परोपकरालागी अवतार केला, आनंदाचा ठेला पांडुरंग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT