Dr Priyanka Narnaware Sakal
पुणे

भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या "मिड करीअर ट्रेनिंग प्रोग्रॅम'मध्ये डॉ. प्रियांका नारनवरे देशात अव्वल

राष्ट्रीय पोलिस अकादमीने घेतलेल्या "मिड करीअर ट्रेनिंग प्रोग्रॅम'(एमसीटीपी) मध्ये पुणे पोलिस दलातील पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे या देशात अव्वल ठरल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय पोलिस अकादमीने घेतलेल्या "मिड करीअर ट्रेनिंग प्रोग्रॅम'(एमसीटीपी) (MCTP) मध्ये पुणे पोलिस दलातील पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे (Dr. Priyanka Narnaware) या देशात अव्वल (Topper) ठरल्या आहेत. तर औरंगाबाद पोलिस दलाच्या अधिक्षक मोक्षदा पाटील (Mokshada Patil) यांनी पाचवा क्रमांक पटकाविला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीने 14 जुन ते 10 जुलै या कालावधीत भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांसाठी हैद्राबाद येथे "मिड करीअर ट्रेनिंग प्रोग्रॅम' आयोजित केला होता. पोलिस महानिरीक्षक या पदाच्या बढतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये दिल्ली, तामीळनाडू, बिहार व महाराष्ट्र केडरमधील तब्बल 104 "आयपीएस' अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून पुणे पोलिस दलातील परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.नारनवरे, मोक्षदा पाटील, हिंगोलीचे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर या तिघांचा सहभाग होता.

प्रशिक्षणामध्ये कार्यक्रम निश्‍चिती, नमुना अभ्यास पद्धती यासह विविध प्रकारे प्रशिक्षण घेण्यात आले. नॅशनल पोलिस ऍकॅडमीचे संचालक अतुल करवार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना या प्रशिक्षणाचा निकाल पाठविला. त्यामध्ये डॉ.नारनवरे या 85.87 टक्के गुण प्राप्त करून पहिल्या आल्या, तर मोक्षदा पाटील यांनी 82.10 टक्के गुण प्राप्त करीत पाचवा क्रमांक प्राप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT